• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : असं कोणी आऊट होतं का? कॉमेंटेटरही म्हणाला Slow Death, पाहा VIDEO

T20 World Cup : असं कोणी आऊट होतं का? कॉमेंटेटरही म्हणाला Slow Death, पाहा VIDEO

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 राऊंडला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa vs Australia) चांगलंच अडचणीत आणलं आहे.

 • Share this:
  अबु धाबी, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 राऊंडला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa vs Australia) चांगलंच अडचणीत आणलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. कर्णधार टेम्बा बऊमा 12 रनवर, क्विंटन डिकॉक 7 रनवर आणि पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शतक करणारा रस्सी व्हॅन डर डुसेन 2 रन करून आऊट झाला. हेनरिच क्लासिन यालाही 13 रन करून आऊट व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने 2 तर ग्लेन मॅक्सवेलला एक आणि पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली. या सामन्यात क्विंटन डिकॉकची (Quinton De Kock) विकेट चर्चेचा विषय ठरत आहे. जॉश हेजलवूडच्या (Josh Hazlewood) बॉलिंगवर क्विंटन डिकॉकने लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल डिकॉकच्या पॅडला लागून हवेत उडला. बॉल कुठे गेला हे त्याला समजलंच नाही. हवेत गेलेला हा बॉल बेल्सवर जाऊन आदळला, ज्यामुळे डिकॉक बोल्ड झाला आणि त्याला माघारी परतावं लागलं. कॉमेंट्री करणाऱ्या मार्क निकोलस यांनीही डिकॉकच्या या विकेटचा उल्लेख स्लो डेथ असा केला. सुपर-12 स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपचा उल्लेख ग्रुप ऑफ डेथ असाही केला जातो, कारण या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या तगड्या टीम या ग्रुपमध्ये आहेत. या सहापैकी टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
  Published by:Shreyas
  First published: