Home /News /sport /

विराटच्या सांगण्यावरूनच या खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, गांगुलीचा मोठा खुलासा

विराटच्या सांगण्यावरूनच या खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, गांगुलीचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अनुभवी ऑफ स्पिनर आर.अश्विनची (R Ashwin) निवड विराट कोहलीच्या (Virat Kohli) सांगण्यावरूनच करण्यात आल्याचं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.

    मुंबई, 14 डिसेंबर : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अनुभवी ऑफ स्पिनर आर.अश्विनची (R Ashwin) निवड विराट कोहलीच्या (Virat Kohli) सांगण्यावरूनच करण्यात आल्याचं सौरव गांगुलीने सांगितलं आहे. अश्विनने 4 वर्षानंतर लिमिटेड ओव्हरमध्ये पुनरागमन केलं. त्याआधी 2017 साली अश्विन वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे खेळला होता. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना संधी मिळाल्यानंतर अश्विन टीमबाहेर गेला. सौरव गांगुलीने क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदारसोबत बातचित केली. 'अश्विन पुन्हा मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये खेळेल, यावर माझा विश्वास नव्हता. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला अश्विन टीममध्ये हवा होता. अश्विननेही त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि उत्कृष्ट कामगिरी केली,' असं गांगुली म्हणाला. अश्विनने टी-20 वर्ल्ड कपच्या 3 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही त्याने शानदार कामगिरी केली. टी-20 वर्ल्ड कप आधी आयपीएल 2021 मध्ये अश्विनने 13 मॅचमध्ये 7 विकेट मिळवल्या. नवीन कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी अश्विनला टीम इंडियाचा अविभाज्य भाग सांगितलं. 'प्रत्येक जण अश्विनबद्दल बोलत आहे. कानपूर टेस्टनंतर द्रविडनेही अश्विन ऑल टाईम ग्रेट असल्याचं सांगितलं. अश्विनची प्रतिभा शोधण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्सची गरज नाही. मी जे बघितलं त्यावरच त्याचं कौतुक केलं,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये एकूण 14 विकेट घेतल्या. यानंतर तो भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा बॉलर बनला. अश्विनने हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकलं, याशिवाय त्याने भारताकडून 111 वनडे आणि 51 टी-20 ही खेळल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: R ashwin, Sourav ganguly, T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या