Home /News /sport /

T20 World Cup 2021 : या दिग्गजामुळे Dhoni झाला टीम इंडियाचा मेंटर, गांगुलीचा खुलासा

T20 World Cup 2021 : या दिग्गजामुळे Dhoni झाला टीम इंडियाचा मेंटर, गांगुलीचा खुलासा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एमएस धोनीला (MS Dhoni Mentor) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाचं मेंटर का करण्यात आलं, याचं कारण सांगितलं आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एमएस धोनीला (MS Dhoni Mentor) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाचं मेंटर का करण्यात आलं, याचं कारण सांगितलं आहे. युवा भारतीय टीमला मोठ्या स्पर्धांमध्ये जास्तीचा सहयोग आणि अनुभवाची गरज आहे, हे धोनी मेंटर म्हणून पूर्ण करू शकतो. धोनीने आपल्या करियरमध्ये अनेकवेळा हे सिद्ध केलं आहे. त्याची ड्रेसिंग रूममधली उपस्थिती टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल, असं गांगुली म्हणाले आहेत. युएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. द टेलिग्राफसोबत बोलताना धोनी टीमसाठी का गरजेचा आहे ते सांगितलं. धोनीचं टी-20 फॉरमॅटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना धोनीने उत्कृष्ट कामगिरी केली. धोनीला असंच मेंटर करण्यात आलेलं नाही. आम्ही खूप विचार करून त्याच्यावर ही जबाबदारी सोपावली आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनी दिली. धोनीला मेंटर करताना गांगुलीनी ऑस्ट्रेलियन टीमचं उदाहरण दिलं. 2019 एशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याला टीमचा मेंटर केलं होतं. याचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध सीरिज 2-2 ने ड्रॉ केली होती. 'आम्ही 2013 नंतर एकही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो नाही. ऑस्ट्रेलियानेही अशाच रोलसाठी स्टीव्ह वॉला टीममध्ये बोलावलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियाने सीरिज बरोबरीत सोडवली होती. टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दिग्गज खेळाडूंची हजेरी टीमसाठी नेहमीच फायदेशीर ठरते,' असं गांगुली यांना वाटतं. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, यानंतर टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. 2015 आणि 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तर 2014 टी-20 फायनल, 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. धोनीचा अनुभव टीम इंडियाच्या कामी येऊ शकतो. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, MS Dhoni, Sourav ganguly, T20 world cup

    पुढील बातम्या