मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : टीम इंडियात 14 खेळाडूंचं स्थान पक्कं, 2 खेळाडूंवरून डोकेदुखी!

T20 World Cup : टीम इंडियात 14 खेळाडूंचं स्थान पक्कं, 2 खेळाडूंवरून डोकेदुखी!

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) लवकरच निवड होणार आहे. या टीममध्ये 14 जणांची निवड निश्चित झाली असून एका खेळाडूवरून डोकेदुखी वाढली आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) लवकरच निवड होणार आहे. या टीममध्ये 14 जणांची निवड निश्चित झाली असून एका खेळाडूवरून डोकेदुखी वाढली आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) लवकरच निवड होणार आहे. या टीममध्ये 14 जणांची निवड निश्चित झाली असून एका खेळाडूवरून डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई, 7 सप्टेंबर : पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) भारतीय टीमची (Team India) लवकरच निवड होणार आहे. या टीममध्ये 14 जणांची निवड निश्चित झाली असून एका खेळाडूवरून डोकेदुखी वाढली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वात निवड समितीची मंगळवार किंवा बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) लंडनमधून ऑनलाईन सहभागी होतील.

वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची घोषणा करणं बंधनकारक असलं तरी टीम इंडिया 18 किंवा 20 खेळाडूंची घोषणा करू शकते. उरलेल्या खेळाडूंना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवलं जाईल. निवड समितीच्या बैठकीत मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि लेग स्पिनर राहुल चहर यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची यावर सर्वाधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीमुळे आयसीसीने 23 ऐवजी 30 सदस्यांच्या टीमला परवानगी दिली आहे. यात खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. टीममध्य 30 पेक्षा जास्त सदस्य असले तर त्याचा खर्च संबंधित देशाच्या बोर्डाला उचलावा लागणार आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये युझवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा या स्पिनर्सचं स्थान पक्कं आहे, तर अतिरिक्त स्पिनर म्हणून वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांच्यात स्पर्धा आहे.

ऋषभ पंत आणि केएल राहुल विकेट कीपरची भूमिका बजावतील, तसंच श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनलाही संधी दिली जाऊ शकते, त्यामुळे संजू सॅमसनचा पत्ता कट होईल. तर श्रेयस अय्यरचंही टीममध्ये पुनरागमन होईल. रोहित शर्मा आणि केएल राहुलशिवाय अतिरिक्त ओपनर म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात स्पर्धा असेल. फास्ट बॉलरमध्ये बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड पक्की आहे, तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराजही दावेदार आहेत.

वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. सरावाशिवाय सुंदरवर निवड समिती विश्वास दाखवेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. डावखुरे फास्ट बॉलर चेतन सकारिया आणि टी नटराजन हे दोन खेळाडूही रेसमध्ये आहेत. नटराजन बऱ्याच काळापासून भारतीय टीममधून बाहेर आहे. तर सकारिया टीम इंडियासोबत नेट बॉलर म्हणून जात आहे.

भारताची संभाव्य टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर

अतिरिक्त ओपनर : शिखर धवन/ पृथ्वी शॉ

राखीव विकेट कीपर : इशान किशन/ संजू सॅमसन

अतिरिक्त स्पिनर : वरुण चक्रवर्ती / राहुल चहर

डावखुरा फास्ट बॉलर : चेतन सकारिया/ टी नटराजन

वॉशिंग्टन सुंदर (फिटनेसवर अवलंबून)

जडेजासाठी राखीव खेळाडू : अक्षर पटेल/ कृणाल पांड्या

First published:
top videos