मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021: 'आम्हाला हलक्यात घेऊ नका', स्कॉटलँडच्या बॉलर्सचे Virat Kohli ला खुले चॅलेंज

T20 World Cup 2021: 'आम्हाला हलक्यात घेऊ नका', स्कॉटलँडच्या बॉलर्सचे Virat Kohli ला खुले चॅलेंज

mark watt

mark watt

टी -20 वर्ल्डकपमध्ये (T20 world cup)तीनपैकी तीनही सामने जिंकणाऱ्या स्कॉटलँड (scotland)संघातील स्पिनर मार्क वाटने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला(virat kohli) खुले चॅलेंज दिले आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: टी -20 वर्ल्डकप स्पर्धा (T20 World Cup) अगदी चुरशीत सुरु आहेत. ग्रुप स्टेजेसचे सामने संपत आले असून जवळपास सर्व पुढील फेरीत जाणारे संघ समोर आले आहेत. बांग्लादेश पाठोपाठ स्कॉटलंड(scotland) संघाने देखील सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे. स्कॉटलंड संघाने ओमानला 8 विकेट्सने नमवत पुढील फेरीत स्थान मिळवलं आहे. आता स्कॉचलंडचा संघ भारत असणाऱ्या गटात गेला असून भारतासोबतही त्यांचा एक सामना असणार आहे. दरम्यान, स्कॉटलँडचा स्पिनर मार्क वाटने (Mark Watt)टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला(Scotland spinner Mark Watt ready to battle Virat Kohli ) खुले चॅलेंज दिले आहे. Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास मिरर स्पोर्टशी बोलताना वॅट म्हणाला, 'विराटसाठी माझ्याकडे काही रणनिती आखली आहे. मी या क्षणी त्यांचा खुलासा करणार नाही परंतु त्यांनी फक्त सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच, आपण खेळता जेणेकरून आपण मोठ्या खेळाडूंना सामोरे जाऊ शकाल. सर्वोत्तम खेळाडू विरुद्ध तुम्ही नेहमी स्वतःला द्यायला हवे. आणि तो नक्कीच जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सर्व खेळाडू जगासमोर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी तयार आहेत. तसेच तो पुढे म्हणाला, 'मला वाटते की आम्ही विश्वचषकात अनेक अपसेट करू. आम्ही हे आधी केले आहे, आम्ही एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम संघाला पराभूत केले आहे. आम्ही बांगलादेशला येथे पराभूत केले आहे. T20 World Cup मध्ये हिट होतेय 12 वर्षांची ही मुलगी, कर्तबगारी पाहून तुम्हालाही बसेल धक्का! त्यामुळे कोणत्याही संघाने आम्हाला हलके घ्यावे असे आम्हाला वाटत नाही. त्यांनी स्कॉटलंडपासून सावध राहिले पाहिजे. आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत आणि काळ सध्या आमच्या बाजूने आहे. काही वेगळे करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही तीनपैकी तीनही सामने जिंकले आहेत. असे वक्तव्य करत वॅटने विराटला खुले आव्हान दिले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या