Home /News /sport /

T20 World Cup: अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत

T20 World Cup: अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारताची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या मॅचपूर्वी अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) विराट कोहलीचं (Virat Kohli) टेन्शन वाढवलं असून त्याला आता महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) मदत घ्यावी लागणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारताची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या मॅचची तयारी टीम इंडियानं जोरदार केली आहे. भारतीय क्रिकेट टीमनं पहिल्या वॉर्म-अप मॅचमध्ये इंग्लंडचा तर दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या दोन विजयानंतर पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या प्लेईंग 11 साठी अनेक दावेदार समोर आले आहेत. 11 जणांच्या टीममध्ये कुणाचा समावेश करायचा याचं नवं टेन्शन कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) आलं असून हा गुंता सोडवण्यासाठी त्याला टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) मदत घ्यावी लागणार आहे. आर. अश्विन (R. Ashwin) हा पाकिस्तान विरुद्धच्या मॅचसाठी प्लेईंग 11 चा मजबूत दावेदार आहे. त्यानं इंग्लंड विरुद्ध (India vs England Warm up match) अचूक बॉलिंग करत 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिले. त्यानंतर दुसऱ्या वॉर्म -अप मॅचमध्ये  ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स घेतल्या. त्यानं सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरला आऊट केलं आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर मिचेल मार्शला आऊट केलं. विशेष म्हणजे अश्विननं नव्या बॉलनं या दोन्ही विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये स्पिन बॉलिंग करण्यासाठीचा पर्याय टीम इंडियाला मिळाला आहे. टीम मॅनेजमेंटसमोर नवी अडचण अश्विननं चांगली कामगिरी केल्यानंतर टीम मॅनेजमेंटची अडचण वाढली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रविंद्र जडेजा सोबत वरुण चक्रवर्ती स्पिनर म्हणून खेळणार हे निश्चित मानलं जात होतं. आता अश्विननं दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये चांगली कामगिरी करत प्लेईंग 11 साठी दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धची प्लेईंग 11 तयार करण्यासाठी विराट-धोनी जोडीला बरीच डोकेफोड करावी लागेल. रोहित आणि अश्विनच्या जुगलबंदीने, B'day बॉय मिचेल मार्शला Gift दिले Duck टीम इंडियाचा सर्वात अनुभवी स्पिनर असलेल्या अश्विनमं आजवर 46 आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये अश्विनचा इकोनॉमी रेट हा 7 पेक्षा कमी आहे. त्याला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचाही मोठा अनुभव आहे. अश्विननं पाकिस्तान विरुद्ध 13 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: R ashwin, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या