मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

R.ashwin ला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित, म्हणाली...

R.ashwin ला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित, म्हणाली...

R.ashwin ला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित, म्हणाली...

R.ashwin ला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित, म्हणाली...

आज भारत आणि इंग्लंड(INDvsENG) या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्पिनर आर अश्विनचा(R Ashwin) एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) कालपासून सुरुवात झाली आहे. आज भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्पिनर आर अश्विनचा(R Ashwin) एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तर चर्चेत आलेल्या या फोटोवर त्याच्या लाडक्या चिमुकलीने दिलेल्या(‘Never seen you in this jersey appa’ R Ashwin’s daughter as he dons India’s coloured jersey) कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात उतरलेली दिसणार आहे. 13 ऑक्टोबर या जर्सीचे अनावरण करण्यात आले होते. तर आता ही जर्सी खेळाडूंपर्यंत पोहोचली आहे. अनेक खेळाडूंनी ही जर्सी परिधान करुन नवा लुक सोशल अकाऊंट्स वर शेअर केले आहेत. या खेळाडूंच्या यादीत आर अश्विनदेखील आहे.

आर अश्विनने देखील आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाची जर्सी घातली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्याने त्याच्या मुलीने दिलेली कमेंट कॅप्शनमध्ये शेअर केली आहे.

“जेव्हा तुमची मुलगी म्हणते की, पप्पा मी तुम्हाला यापूर्वी या जर्सीमध्ये कधीच पाहिलं नाही. तिची ही कमेंट ऐकली असता मी तिला या फोटोमध्ये घेणार नाही असं होऊच शकत नाही.” असे अश्विनने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashwin (@rashwin99)

4 वर्षानंतर त्याचे टी -20 संघात पुनरागमन

अश्विन गेली बरीच वर्षे कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याला वनडे आणि टी-20 संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. आता 4 वर्षानंतर त्याला टी -20 संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा त्याने भारतीय संघाची निळ्या रंगाची जर्सी घातली होती. त्यावेळी त्याची मुलगी खूप लहान होती.

अश्विनला दोन मुली आहेत. अश्विनने त्याची बालमैत्रीण प्रीती नारायणबरोबर 13 नोव्हेंबर 2011रोजी लग्न केले. या दाम्पत्याला 11 जूलै 2015 ला पहिली मुलगी झाली. तर डिसेंबर 2016 ला प्रीतीने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव अकिरा असून लहान मुलीचे नाव आध्या आहे.

आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.

First published:

Tags: R ashwin, T20 cricket, T20 league, T20 world cup