मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup आधी पाकिस्तानने 'कट' केलं भारताचं नाव, वादाची ठिणगी पेटणार!

T20 World Cup आधी पाकिस्तानने 'कट' केलं भारताचं नाव, वादाची ठिणगी पेटणार!

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला सुरुवात होणार आहे, त्याआधी बहुतेक टीम युएईमध्ये दाखल होत आहेत.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 7 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला सुरुवात होणार आहे, त्याआधी बहुतेक टीम युएईमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या राऊंडमध्ये 8 टीम सुपर-12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी खेळतील. टी-20 वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक देशाच्या टीम त्यांची जर्सी लॉन्च करत आहेत, पण या जर्सीवरूनच आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होणार असला तरी त्याचं आयोजन भारताकडून केलं जाणार आहे. त्यामुळे जर्सीवर आयोजक देश म्हणून भारताचं नाव लिहिणं गरजेचं आहे. पाकिस्तानने मात्र भारताचं नाव लिहिण्याऐवजी युएईचं (Pakistan Jersey) नाव लिहिलं आहे. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या हरकतीमुळे बीसीसीआय (BCCI) मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार स्पर्धेसाठीच्या जर्सीच्या उजव्या बाजूला आयोजक देशाचं नाव असणं बंधनकारक आहे. या नियमानुसार ‘ICC Men’s T20 World Cup India 2021’ असं जर्सीवर लिहिलेलं असलं पाहिजे, पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तानच्या जर्सीवर पाकिस्तानने भारताऐवजी युएई लिहिलं आहे. Pakistan and Australia T20 WC jerseys पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्याच्या जर्सीवर ‘ICC Men’s T20 World Cup UAE 2021’ लिहिलं आहे. पाकिस्तानने अजून अधिकृतरित्या ही जर्सी लॉन्च केलेली नाही, त्यामुळे अशाचप्रकारची जर्सी जर लॉन्च करण्यात आली तर आयसीसी किंवा बीसीसीआय यावर आक्षेप घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. Scotland Cricket Team jersey for T20 World Cup 2021 टी-20 वर्ल्ड कपचा क्वालिफायिंग राऊंड खेळणाऱ्या टीमनी त्यांच्या जर्सी लॉन्च केल्या आहेत. स्कॉटलंडने त्यांच्या जर्सीवर भारताचा नाव लिहिलं आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन भारतातच होणार होतं, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात येत आहे. असं असलं तरी बीसीसीआय म्हणजे भारतच या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे.
First published:

Tags: Pakistan, T20 world cup

पुढील बातम्या