मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये टीम इंडियासमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज, पाकिस्तान 36 पावलं पुढे!

T20 World Cup मध्ये टीम इंडियासमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज, पाकिस्तान 36 पावलं पुढे!

 टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या 15 खेळाडूंवर 14 वर्षांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून द्यायची जबाबदारी असेल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या 15 खेळाडूंवर 14 वर्षांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून द्यायची जबाबदारी असेल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या 15 खेळाडूंवर 14 वर्षांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून द्यायची जबाबदारी असेल.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या 15 खेळाडूंवर 14 वर्षांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून द्यायची जबाबदारी असेल. 2007 नंतर भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, पण युएईमधलं एक रेकॉर्ड भारताला अडचणीचं ठरू शकतं. भारतीय खेळाडू युएईमध्ये (UAE) आयपीएल (IPL) खेळले असले, तरी त्यांना आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव नाही. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड कप होणार आहे. एकूण 16 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि क्वालिफायरमधून आलेल्या दोन टीम असतील. भारताने युएईमध्ये अजूनपर्यंत एकही टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही, तर दुसरीकडे पाकिस्तानला युएईमध्ये 36 टी-20 आंतरराष्ट्रीयचा अनुभव आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही काही दिवसांपूर्वी युएईमध्ये खेळणं आमच्या घरासारखंच आहे, असं वक्तव्य केलं होतं.

पाकिस्तानने युएईमध्ये 21 टी-20 मॅच जिंकल्या. अफगाणिस्तानच्या टीमनेही युएईमध्ये 33 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, यातल्या 26 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. न्यूझीलंडने युएईमध्ये 7 मॅच खेळल्या, यातली एकच मॅच त्यांना जिंकता आली.

दुसऱ्या ग्रुपमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमनाही युएईमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 खेळण्याचा अनुभव आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. दुबईमध्ये हा सामना रंगेल. या मैदानात पाकिस्तानने 25 टी-20 खेळल्या, यातल्या 14 सामन्यांमध्ये त्यांचा विजय आणि 10 मॅचमध्ये पराभव झाला. पाकिस्तानने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 पेक्षा जास्त विजय मिळवणारी पाकिस्तानची एकमेव टीम आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 8 टी-20 मॅच झाल्या, यातल्या 7 मॅच भारताने जिंकल्या, तर पाकिस्तानला फक्त एक सामना जिंकता आला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम 5 वेळा आमने-सामने होत्या, यातल्या प्रत्येकवेळी भारताचा विजय झाला.

टी-20 वर्ल्ड कपचा हा सातवा सिझन आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांना प्रत्येकी एक-एक वेळा आणि वेस्ट इंडिजला दोनवेळा स्पर्धा जिंकता आली आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आपलं रेकॉर्ड सुधारण्यासाठी मैदानात उतरतील.

First published:

Tags: Pakistan, T20 world cup, Team india, UAE