• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : India vs Pakistan सामना रद्द करण्याची मागणी, ओवेसींनी घेतली वादात उडी

T20 World Cup : India vs Pakistan सामना रद्द करण्याची मागणी, ओवेसींनी घेतली वादात उडी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 • Share this:
  हैदराबाद, 19 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना होऊ नये, असं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग (Giriraj Singh) आणि रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत. तर या वादात आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही उडी घेतली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन विषयांवर कधीच बोलत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. चीन आपला भूभाग असलेल्या लडाखमध्ये येऊन बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपले 9 जवान शहीद झाले आहेत आणि 24 तारखेला भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 मॅच होणार आहे,' असं वक्तव्य ओवेसींनी केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. यानंतर ट्विटरवर #BoycottPakistan हा हॅशटॅग ट्रेंड वर आहे. BCCI चं स्पष्टीकरण भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, असं मत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी मांडलं आहे. 'काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जो भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील', असं वक्तव्य राजीव शुक्ला यांनी केलं.
  Published by:Shreyas
  First published: