दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 12 फेरीत अफगाणिस्तानच्या संघाने स्कॉटलॅंडचा (Afghanistan v Scotland) पराभव करून विजयी सुरुवात केली. खरतंर अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण देशात तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतरच अफगाणिस्तान क्रिकेटच्या (Taliban Rule in Afghanistan) भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध स्कॉटलॅंडसामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
स्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या वेळी समर्थक आणि स्टेडियममध्ये बसलेला संघाचा कर्णधार मोहम्मद नबी भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अफगाणिस्तानच्या लोकांसाठीही हा खूप भावनिक क्षण होता कारण देश सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत आपला संघ विश्वचषकात खेळताना पाहणे आणि अफगाणिस्तानचा सुंदर ध्वज राष्ट्रगीतासह जागतिक मंचावर फडकताना पाहणे हा त्याच्यासाठी अभिमानास्पद होता.
Who can hold tears! Incredibly painful to watch.
Good luck lads @AfghanAtalan1 #AFGvsSCO #ICCT20WorldCup2021 @MohammadNabi007 @rashidkhan_19 pic.twitter.com/W9dhPnDV40 — Khalid Payenda (@KhalidPayenda) October 25, 2021
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतही नबी म्हणाला होता की, गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये खूप काही घडत आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण क्रिकेटच्या दृष्टिकोनातून सर्वजण या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज आहेत आणि आम्ही चांगली तयारी केली आहे. चाहते खरोखर वाट पाहत आहेत.
कारण सध्या अफगाणिस्तानात आनंदाचे एकमेव साधन क्रिकेट आहे. आम्ही चांगली कामगिरी करून जिंकलो तर क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल. असे मत नबी याने यावेळी व्यक्त केले.
शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर (Sharjah Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने स्कॉटलॅंडच्या संघाला तब्बल 130 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुजीब रेहमान (Mujeeb Rahman) आणि राशिद खान (Rashid Khan) फिरकीची जादू दिसली. या दोघांनी मिळून स्कॉटलॅंडचे 9 फलंदाज माघारी धाडले. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला मोठ्या धावांनी विजय मिळवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, T20 cricket, T20 world cup, Taliban