मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहित आणि अश्विनच्या जुगलबंदीने, B'day बॉय मिचेल मार्शला Gift दिले Duck

रोहित आणि अश्विनच्या जुगलबंदीने, B'day बॉय मिचेल मार्शला Gift दिले Duck

रोहित आणि अश्विनची जुगलबंदीने, B'day बॉय मिचेल मार्शला Gift दिले DuckOut

रोहित आणि अश्विनची जुगलबंदीने, B'day बॉय मिचेल मार्शला Gift दिले DuckOut

टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात झाली असून तत्पूर्वी सराव सामने (warm up match)खेळवण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात (INDvsAUS) झाली असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. दरम्यान, एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 20 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात झाली असून तत्पूर्वी सराव सामने (warm up match)खेळवण्यात येत आहेत. यामध्ये भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)या संघासोबत भिडणार आहे. टीम इंडियाचा दुसऱ्या सराव सामन्याला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. दरम्यान, एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.

ऑस्ट्रेलियासोबत सुरु असलेल्या सराव सामन्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर आश्विनने कमालीची खेळी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच षटकात दोन महत्त्वाचे विकेट मिळवत आश्विनने कांगारुच्या मिचेल मार्शला वाढदिवसादिवशी भन्नाट गिफ्ट दिले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श झटपट बाद झाले. डेविड वॉर्नर पायचीत होत तंबूत परतला. आयपीएलनंतर टी वर्ल्डकपमध्येही डेविड वॉर्नरला सूर गवसताना दिसत नाही. तर मिशेल मार्श आपले खातंही खोलू शकला नाही. विशेष म्हणजे आज मिशेल मार्शल आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पहिल्याच षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने मार्शलला शून्यावर झेलबाद केल्यामुळे सोशल मीडियावर रोहित आणि अश्विनची जुगलबंदीने मार्शलला भन्नाट बर्थ डे गिफ्ट दिले असल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असून सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातील पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट नाही तर रोहित कर्णधारपद सांभाळत आहे. दरम्यान सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे.

First published:
top videos

    Tags: India vs Australia, R ashwin, Rohit sharma, T20 cricket, T20 world cup