दुबई, 3 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup) सुपर 12 मधील ग्रुप 1 मध्ये उत्तम कामगिरी करत बांग्लादेशला (Bangladesh vs South Africa) मात दिली आहे. मात्र, या सामन्याला गालबोट लागले आहे. सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि मेहदी हसन (Mehidy Hasan) या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, इतकेच नव्हे तर मेहदी हसनने शिवीगाळ केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिका संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला क्विंटन डी कॉकची बॅट चांगलीच तळपली असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी बांगलादेश संघाकडून 5 वे षटक टाकण्यासाठी मेहदी हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने जागा बनवून शॉट खेळत कव्हरच्या वरून चौकार मारला. इतकेच नव्हे तर पुढच्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्वीप शॉट खेळत चौकार मारला.
हे दोन अप्रतिम शॉट पाहून, गोलंदाजाने आपले नियंत्रण गमावले होते. परंतु पुढच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा जागा बनवून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात चेंडू टप्पा पडून आत आला आणि यष्टीला जाऊन धडकला. क्विंटन डी कॉक 16 धावा करत माघारी परतला. क्विंटन डी कॉक त्रिफळाचित झाल्यानंतर मेहदी हसनने संतापात अपशब्दांचा वापर केला.
View this post on Instagram
परंतु क्विंटन डी कॉकने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तो पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशला आफ्रिकेने त्यांच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याने अवघ्या 84 धावांत सर्वबाद झाले. ज्यानंतर केवळ 4 गडी गमावत 13.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सेमीफायलनमध्ये पोहचण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, T20 cricket, T20 world cup