दुबई, 27 ऑक्टोबर: पाकिस्तानच्या पराभवानंतर क्रिकेट जगताता टीम इंडियामध्ये (Team India) मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानविरुद्ध (INDvsPAK) झालेल्या लढतीत विराट कोहली वगळता भारतीय संघाचा कोणताही गोलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यात अनफिट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहे. त्याला आगामी न्यूझीलंडविरुद्ध (ind vs nz)होणाऱ्या सामन्यातून वगळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हार्दिकची केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही त्याची कामगिरी अत्यंत खराब असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याला कोणता खेळाडू रिप्लेस करणार यावर अनेक चर्चा क्रिकेट जगतात होत आहेत.
गेल्या काही काळापासून हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. हार्दिकची फलंदाजीही काही फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नाही. हार्दिकला फलंदाज म्हणून खालील ऑर्डरमध्ये स्थान देण्यात येईल, असे निवडकर्त्यांनी वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं.
अशा स्थितीत पुढील सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये असणारा धावणारा इशान किशन हार्दिकची जागा घेऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात इशानने उत्तम खेळी केली होती. याशिवाय आयपीएलमध्येही ईशानची बॅट तळपली होती. त्यामुळे हार्दिकच्या जागी ईशानची निवड होईल असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पांड्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. शाहीन आफ्रिदीचा एक चेंडू थेट हार्दिकच्या खांद्यावर लागला. त्यामुळे तो संपूर्ण सामन्यात फिल्डींगसाठी आला नाही. हार्दिक या स्पर्धेपूर्वीही पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. हार्दिकच्या जागी इशान किशन 5-6 व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो.
यासोबतच, टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा टीममध्ये नंबर लागू शकतो. शार्दूल गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टी सांभाळू शकतो. तो टीम इंडियाचा सर्वात मोठा गम चेंजर का मानला जातो हे त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही अनेकदा दाखवून दिलं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात भुवनेश्वरच्या जागी त्याला प्लेइंग 11 मध्येही स्थान दिले जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, T20 cricket, T20 league, T20 world cup