• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • PAK च्या विजयानंतर टीम इंडियाचे वाढले टेन्शन, Hardik Pandya Injury ; पुढचा सामना खेळू शकेल का?

PAK च्या विजयानंतर टीम इंडियाचे वाढले टेन्शन, Hardik Pandya Injury ; पुढचा सामना खेळू शकेल का?

Hardik Pandya

Hardik Pandya

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत नाही हा संघासाठी चिंतेचा विषय होताच. शिवाय तो लवकरच बरा होईल आणि या विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल अशी अपेक्षा होती. पण...

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ (Team India)पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. या पराभवासोबत टीम इंडियाच्या टेंशनमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे अनफिट हार्दिक पांड्या (India all-rounder Hardik Pandya was hit on his right shoulder while batting). काल झालेल्या सामन्यानंतर अष्टपैलू खेळडू हार्दिक पांड्या याला थेट रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची ही दुखापत कितपत गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला खेळवण्यात येईला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत नाही हा संघासाठी चिंतेचा विषय होताच. शिवाय तो लवकरच बरा होईल आणि या विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल अशी अपेक्षा होती. पण पाकिस्तानविरुद्ध सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत (Shoulder Injury) झाली. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला लागला. भारतीय डावात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा (Shaheen Afridi) वेगवान चेंडू खांद्याला लागल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दुसऱ्या डावात हार्दिक फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. ईशान किशन त्याच्या जागी क्षेत्ररक्षण करताना दिसला. भारताने फलंदाजी करून 151/7 धावसंख्येत हार्दिक आठ चेंडूत 11 धावाच करू शकला.

  पांड्या पाठदुखीनेही त्रस्त होता

  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा सामना अतिशय खास होता, कारण हा त्याचा 50 वा टी -20 सामना होता. नाणेफेकीनंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पांड्याने पाठदुखीचा त्रास होत असल्याचा खुलासा केला होता. पण आता परिस्थिती ठीक असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. भारताने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज दीडशतकी भागीदारीच्या जोरावर 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय संघावर मात केली आहे. भारताला आता पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत पांड्याच्या दुखापतीमुळे भारताचा तणाव वाढला आहे. पांड्याच्या फिटनेसबद्दल टीम इंडिया आधीच चिंतेत होती, कारण तो बराच काळ गोलंदाजी करू शकला नाही. आता यामध्ये आणखी भर पडली असून क्रिकेट जगतात  न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला खेळवण्यात येईल का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: