मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Pak : वसीम जाफरनं भन्नाट मीम्स शेअर करत पाकिस्तानला डिवचले

Ind vs Pak : वसीम जाफरनं भन्नाट मीम्स शेअर करत पाकिस्तानला डिवचले

wasim jaffer

wasim jaffer

टी20 वर्ल्ड कपमध्ये(T20 World Cup) पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. सर्वांचे लक्ष या सामन्याकडे वेधले असून दोन्ही देशात वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) महामुकाबला होणार आहे. पहिल्याच सामन्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. सर्वांचे लक्ष या सामन्याकडे वेधले असून दोन्ही देशात वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच, टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरने(wasim jaffer share a meme) भन्नाट मीम्स शेअर करत पाकिस्तानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताने 2014, 2012 मधील टी20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला. त्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये पाकिस्तानला हरवत टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे यंदा काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी आणि कुठे पाहता येणार?

दरम्यान, जाफरने एक ट्विट शेअर करत पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्या मीम्समध्ये पाकिस्तान चांगला चेसर नसल्यानं टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करावी, असं त्या मीम्समध्ये म्हटले आहे.

टीम इंडियाचं विजयावर लक्ष

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यावर आपले मत मांडले. ''पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचा कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच दाखवू.” असे सांगत विराटने या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.

T20 WC : ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराट कोहलीने 'playing 11' वर केला खुलासा

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संघ

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup