• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धच्या मुकाबल्याआधी विराट टेन्शनमध्ये, धोनी सोडवणार कोडं!

T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धच्या मुकाबल्याआधी विराट टेन्शनमध्ये, धोनी सोडवणार कोडं!

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली असली तरी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 19 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली असली तरी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. आतापर्यंत टी-20 आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध कधीच पराभव झालेला नाही, त्यामुळे यंदाही हे रेकॉर्ड अबाधित राहिल, असा विश्वास टीम इंडिया आणि चाहत्यांना आहे. पण या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टेन्शनमध्ये आला आहे. विराटचं टेन्शन पाकिस्तानने नाही तर आपल्याच खेळाडूंनी वाढवलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा एक ओव्हर राखून धमाकेदार विजय झाला. या विजयानंतर विराटला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीमची निवड करणं कठीण असणार आहे. विराट कोहलीसमोरचं हे कोडं टीमचा मेंटर एमएस धोनी (MS Dhoni) सोडवू शकतो. ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत आणि मग बॉलिंगमध्येही अनेक खेळाडूंनी आपला दावा ठोकला आहे, सोबतच काही खेळाडूंचा फॉर्मही विराटसाठी चिंतेचा विषय आहे. स्वत: विराटचा फॉर्मही टीमची काळजी वाढवणारा आहे. टीम इंडिया बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक सराव सामना खेळणार आहे. या मॅचनंतर विराटसमोरची अडचण दूर होण्याची शक्यता आहे. इशान किशन 23 वर्षांच्या इशान किशनने (Ishan Kishan) इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात 46 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली आणि प्लेयिंग इलेव्हनमध्ये आपला दावा ठोकला. ओपनिंगला बॅटिंग करत किशानने ही खेळी केली. तरीही केएल राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला खेळतील हे विराटने आधीच स्पष्ट केलं आहे. इशानचा सध्याचा फॉर्म बघता त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये राहणार का बॅटर म्हणून याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात हार्दिकने बॉलिंग केली नाही. 2019 साली झालेल्या पाठीच्या दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे हार्दिक बराच काळ क्रिकेटपासून लांब राहिला, तसंच तो फारशी बॉलिंगही करत नाही. आयपीएल 2021 च्या मोसमातही त्याने बॉलिंग केली नाही. तेव्हापासून हार्दिकच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. भुवनेश्वर कुमार भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) अनुभव टीमच्या कामाला येईल, असं विराट स्पर्धा सुरू व्हायच्या आधी म्हणाला होता, पण सराव सामन्यात भुवी संघर्ष करताना दिसला. 4 ओव्हरमध्ये त्याने 54 रन दिले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
  Published by:Shreyas
  First published: