• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर Team India मध्ये होणार मोठा बदल; 'या' खेळडूंचा पत्ता कट

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर Team India मध्ये होणार मोठा बदल; 'या' खेळडूंचा पत्ता कट

Team Inia

Team Inia

अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG ) होणाऱ्या सामन्यापूर्वी, टीम इंडियाच्या संघामध्ये (Team India) मोठा बदल करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 • Share this:
  दुबई, 1 नोव्हेंबर: टीम इंडियाला (Team India) पाकिस्ताननंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र आता संघासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. टीम इंडियाचा आगामी सामना उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानसोबत होणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतात, टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

  वरुण चक्रवर्तीला डच्चू

  पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. वरुण चक्रवर्तीला दोन्ही सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीचा पत्ता कट होऊ शकतो. आणि आर अश्विनला संधी मिळू शकते. टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला अद्याप वर्ल्डकपमध्ये संधी देण्यात आलेली नाही. भारताचे माजी सिलेक्टर दिलीप वेंगसरकर म्हणाले की, अश्विनला पुन्हा का वगळले जात आहे? हा तपासाचा विषय आहे. अश्विन हा प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असून त्याने 600 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात वरिष्ठ फिरकीपटू आहे आणि तो एकटाच नाही. मला समजले नाही. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एकही सामना खेळला नाही. अश्विनची निवड का झाली, हे माझ्यासाठी एक रहस्य आहे.

  मोहम्मद शमीच्या जागी राहुल चहर

  मोहम्मद शमीचा संघ भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला सामना गमावून मोठी किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही. फगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला वगळले जाऊ शकते. मोहम्मद शमीच्या जागी लेगस्पिनर राहुल चहरला संधी दिली जाऊ शकते. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तेवढा प्रभावी ठरत नाही, त्यामुळे लेगस्पिनर राहुल चहर जर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला तर फायदा होऊ शकतो. राहुल चहरची तगडी गोलंदाजी भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून देऊ शकते.
  Published by:Dhanshri Otari
  First published: