• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : न्यूझीलंडच्या या 4 बॉलर्सपासून टीम इंडियाला धोका, सगळे बुमराहपेक्षा भारी!

T20 World Cup : न्यूझीलंडच्या या 4 बॉलर्सपासून टीम इंडियाला धोका, सगळे बुमराहपेक्षा भारी!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) खेळणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) खेळणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव झाला होता. भारतीय टीमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेलं नाही. याआधी 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा किवी टीमने पराभव केला होता. यावेळी किवी टीममध्ये असलेल्या ईश सोढी (Ish Sodhi), टीम साऊदी (Tim Southee), मिचेल सॅन्टनर (Mitchell Santner) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) या चार बॉलर्सपासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे. टी-20मध्ये या बॉलर्सची कामगिरी म्हणजेच स्ट्राईक रेट टीम इंडियाचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराहपेक्षा (Jasprit Bumrah) चांगला आहे. टीम साऊदी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट घेणारा जगातला तिसरा बॉलर आहे. कोणत्याही भारतीय बॉलरला अशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत साऊदीने 82 इनिंगमध्ये 25 च्या सरासरीने 100 विकेट घेतल्या. 18 रन देऊन 5 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. साऊदीचा स्ट्राईक रेट 18 आहे, म्हणजेच प्रत्येक 18 बॉलनंतर साऊदी विकेट घेतो. तर जसप्रीत बुमराहचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला स्ट्राईक रेट 18.5 आहे. साऊदीने भारताविरुद्ध 12 इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या. 17 रन देऊन 3 विकेट ही त्याची भारताविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे. ईश सोढीची कामगिरी सर्वोत्तम लेग स्पिनर ईश सोढीने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 56 इनिंगमध्ये 75 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सोढी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 28 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सोढीचा स्ट्राईक रेटही फक्त 16 चा आहे. सोढी भारताविरुद्ध न्यूझीलंडचा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. 12 इनिंगमध्ये 19 च्या सरासरीने त्याने 17 विकेट घेतल्या. भारताविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट 15 चा आणि इकोनॉमी रेट 7.53 चा आहे. या सामन्यात टीम इंडियाला सोढीपासून सावध राहण्याची गरज आहे. बोल्ट-सॅन्टनरही मागे नाहीत न्यूझीलंडचा डावखुरा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने आपणही भारताला शाहिन आफ्रिदीसारखा त्रास देऊ असा इशारा दिला आहे. बोल्टने 35 इनिंगमध्ये 24 च्या सरासरीने 47 विकेट घेतल्या, त्याचा स्ट्राईक रेट 16.5 चा आहे. 34 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. डावखुरा स्पिनर मिचेल सॅन्टनरने 52 इनिंगमध्ये 22 च्या सरासरीने 61 विकेट घेतल्या. सॅन्टनरचा स्ट्राईक रेट 17.5 चा आहे. 11 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरना एकही विकेट मिळाली नव्हती. तर न्यूझीलंडचाही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला होता, पण त्यांच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. ईश सोढीने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 2 विकेट घेतल्या, त्याचा स्ट्राईक रेट 12 होता. याशिवाय टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल सॅन्टनर यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:Shreyas
  First published: