• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : 'अरमान पूरा करने का यही मौका है...', ऋषभ पंतचा शायरना अंदाज Stump Mic मध्ये कैद

T20 World Cup : 'अरमान पूरा करने का यही मौका है...', ऋषभ पंतचा शायरना अंदाज Stump Mic मध्ये कैद

इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यापासून टीम इंडियाच्या (India vs England Practice Match) टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा शायरना अंदाज पाहायला मिळाला.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यापासून टीम इंडियाच्या (India vs England Practice Match) टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा शायरना अंदाज पाहायला मिळाला. इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो बॅटिंग करत असताना आर.अश्विन बॉलिंग करत होता, तेव्हा ऋषभ पंत शायरी म्हणाला. ऋषभ पंतचा हा शेर स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला. 'अरमान पूरा करने का यही मौका है. लेग स्पिन करने का. मौका भी है दस्तूर भी है,' असं ऋषभ पंत विकेट कीपिंग करत असताना म्हणाला. या सामन्यात इंग्लंडने भारताला (India vs England Practice Match) विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या बॉलर्सना इंग्लंडला छोट्या धावसंख्येवर रोखण्यात अपयश आलं. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 188 रन केले. जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 49 रन केले, तर मोईन अली (Moeen Ali) 43 रनवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा (India vs England Warm Up Match) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधी भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात आपण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरणार असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळणार आहेत. आयपीएलआधी गोष्टी वेगळ्या होत्या, पण राहुलच्या आयपीएलमधल्या कामगिरीमुळे तो आता ओपनिंगला खेळेल, असं विराटने टॉसवेळी सांगितलं. आयपीएलच्या या मोसमात पंजाबकडून खेळताना राहुलने 600 पेक्षा जास्त रन केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला खेळणार असला तरी या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
  Published by:Shreyas
  First published: