• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Warm Up Match नंतर Wasim Jaffer ने मायकल वॉनची उडवली खिल्ली; म्हणाला...

Warm Up Match नंतर Wasim Jaffer ने मायकल वॉनची उडवली खिल्ली; म्हणाला...

Warm Up Match नंतर Wasim Jaffer ने मायकल वॉनची उडवली खिल्ली; म्हणाला...

Warm Up Match नंतर Wasim Jaffer ने मायकल वॉनची उडवली खिल्ली; म्हणाला...

भारताच्या या विजयानंतर माजी सलामीवीर वासिम जाफर याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला ट्विट करत डिवचण्याचा (Wasim Jaffer Trolls Vaughan)प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : युएई येथे सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये(ICC T20 Worldcup) काल इंग्लंडविरुद्ध वॉर्मअम मॅच (Warm Up Match) खेळवण्यात आली. या सामन्यात भारताने 7 विकेट आणि एक ओव्हर राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर माजी सलामीवीर वासिम जाफर याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला ट्विट करत डिवचण्याचा (Wasim Jaffer Trolls Vaughan)प्रयत्न केला आहे. भारतीय क्रिकेट संघावर सातत्याने टीका करणारा व तोंडसुख घेणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा नेहमी भारतीय चाहते व माजी दिग्गज खेळाडूंच्या निशाण्यावर असतो.

  जाफरने घेतली वॉनची फिरकी

  सोमवारी झालेल्या पहिल्या वॉर्मअम मॅचमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारल्यानंतर जाफरने संधी साधत मायकल वॉनला डिवचले. ‘या विजयावेळी तीन गोष्टी वेगळ्या ठरल्या: केएल राहुल व ईशान किशन बॅटसोबत, बुमराह, अश्विन आणि शमी बॉलसोबत, मायकल वॉन ऑफलाईन राहिला’ त्याच्या या ट्विटवर चाहते देखील मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडविरुद्ध वॉर्मअम मॅचमध्ये प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुबईतील आयसीसी मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतासाठी केएल राहुल व ईशान किशन यांनी 8.2 षटकात 82 धावांची शानदार सलामी दिली. राहुल तुफानी अर्धशतक काढून बाद झाला तर, ईशान किशनने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी 69 धावांचे योगदान दिले. रिषभ पंतने अखेरीस आक्रमक 29 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

  जेव्हा वॉन जाफरला ब्लॉक करण्याबद्दल बोलला

  इंग्लंड दौऱ्यादरम्यान, दोघांच्या वाद झाला होता. एका मुलाखतीदरम्यान, वॉनला असा कोणता खेळाडू आहे ज्याला तुला ब्लॉक करायला आवडेल असे विचारण्यात आले होते. तेव्हा वॉनने जाफरचे नाव घेतले होते. जाफरला हे समजताच त्याने त्याच्या वक्तव्याचा लगेचच बदला घेतला होता. ट्विटरवर जाफरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या विजयाचा फोटो पोस्ट केला. या मालिकेचा हा फोटो होता जेव्हा जाफर देखील संघाचा एक भाग होता. त्याच वेळी, त्याने वॉनची खिल्ली उडवली आणि लिहिले, "माझे मित्र आणि मी मायकल वॉन मला ब्लॉक करू इच्छित असल्याचे कळल्यानंतर."
  Published by:Dhanshri Otari
  First published: