मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

INDvsPAK ‘चाचा शिकागो’ धर्मसंकटात; केली PAK साठी प्रार्थना पण DHONI वर जडला जीव

INDvsPAK ‘चाचा शिकागो’ धर्मसंकटात; केली PAK साठी प्रार्थना पण DHONI वर जडला जीव

chacha chicago

chacha chicago

भारत-पाकिस्तान (T20 World Cup, INDvsPAK)सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांतील नागरीकांना दुबईत हजेरी लावली आहे. दरम्यान, एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 23 ऑक्टोबर: भारत-पाकिस्तान (T20 World Cup, INDvsPAK)सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांतील नागरीकांना दुबईत हजेरी लावली आहे. दरम्यान, एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांचा ज्यांना क्रिकेट जगतात ‘चाचा शिकागो’ (chacha chicago)म्हणून ओळखले जाते. व्हिडीओत चाचा शिकागो एकिकडे पाकला सपोर्ट करत आहेत तर दुसरीकडे टीम इंडियाचा मेटॉर म्हणून निवड झालेल्या महेंद्र सिंहबद्दल (MS Dhoni) प्रेम व्यक्त करत आहेत.

दोन्ही देशातील टीम एका मोठ्या गॅपनंतर आमने सामने येणार आहेत. त्यात महेंद्र सिंह धोनी सुद्धा भारतीय क्रिकेट टीमसोबत एका नव्या रूपात एन्ट्री करतोय. त्यामुळे या सामन्यासाठी फॅन्समध्ये देखील मोठी उत्सुकता दिसून येत आहे. भारत पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्याला काही तास शिल्लक राहिले असतानाच धोनीचा पाकीस्तानी जबरा फॅन ‘चाचा शिकागो’ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. जबरा फॅन ‘चाचा शिकागो’ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी एक खास संदेश दिला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चाचा शिकागो म्हणाले, मी खूप खुश आहे. मी ह्रदयापासूल प्रार्थना करतो ती हा सामना पाकिस्तान जिंकेल. पण, महेंद्र सिंह धोनी माझे फेवरेट आहे. असे सांगतात आणि त्यानंतर पाकिस्तानच्या विजयासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा परंतु, व्हिडीओच्या शेवटी “ आय लव्ह यू'' धोनी म्हणत माहीविषयी प्रेम व्यक्त करतात.

इतकेच नव्हे तर, चाचा शिकागो यांनी या सामन्यासाठी खास जर्सी परिधान केली आहे. अर्धा भाग भारत आणि अर्धा भाग पाकिस्तानच्या जर्सीला एकत्र करत त्यांनी परिधान केलेली ही स्पेशल जर्सी खूप काही सांगून जाते. दोन्ही देशांची जर्सी एकत्र करत त्यांनी परिधान केलेल्या या जर्सीच्या मधोमध ‘वेलकम बॅक धोनी’ असं इंग्रजीमध्ये लिहिले आहे.

धोनी निवृत्त झाला आणि मीही

‘चाचा शिकागो’ यांचं नाव ​​मोहम्मद बशीर असून ते पाकिस्तानचे आहेत. शिकागोमध्ये ते एक रेस्टॉरंट चालवतात. धोनीने ज्यावेळी निवृत्ती घेतली त्यावेळी ते म्हणाले होते, ‘धोनी निवृत्त झाला आणि मीही. तो खेळत नसल्यामुळे, मला वाटत नाही की मी पुन्हा क्रिकेट पाहण्यासाठी प्रयत्न करेन. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि त्या बदल्यात त्याने मला परत प्रेमही दिले.”

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दोन्ही संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांचा सुपर-12 गटातील हा पहिलाच सामना आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ५ सामने झाले असून टीम इंडियाने पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, MS Dhoni, T20 cricket, T20 league, T20 world cup