मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये फक्त दोनच 'भारतीय' दिसणार, ICC ने केली घोषणा

T20 World Cup मध्ये फक्त दोनच 'भारतीय' दिसणार, ICC ने केली घोषणा

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये सुरूवात होणार आहे. याआधी आयसीसीने (ICC) राऊंड वन आणि सुपर-12 साठीच्या 20 सामन्यांसाठी मॅच अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

  • Published by:  Shreyas
दुबई, 7 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये सुरूवात होणार आहे. याआधी आयसीसीने (ICC) राऊंड वन आणि सुपर-12 साठीच्या 20 सामन्यांसाठी मॅच अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये फक्त दोन भारतीयांचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये अंपायर म्हणून नितीन मेनन (Nitin Menon) आणि मॅच रेफ्री म्हणून जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी मराईस इरासमस आणि इंग्लंडचे क्रिस गाफने अंपायर असतील, तर रिचर्ड एलिंगवर्थ टीव्ही अंपायर म्हणून काम पाहतील. डेव्हिड बून या सामन्याचे मॅच रेफ्री असतील. टी-20 वर्ल्ड कपसाठी 16 अंपायर आणि चार मॅच रेफ्रींची निवड करण्यात आली आहे. 45 मॅचच्या या स्पर्धेत अलीम दार, इरासमस आणि रॉड टकर हे असे अंपायर आहेत ज्यांचा सहावा पुरुष टी-20 वर्ल्ड कप असेल. मस्कट (ओमान), अबुधाबी, शारजाह आणि दुबई (युएई) मध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. सेमी फायनल आणि फायनलसाठीच्या मॅच अधिकाऱ्यांची घोषणा आयसीसी नंतर करणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच स्पर्धेच्या सगळ्या सामन्यांमध्ये तटस्थ अंपायर असतील. स्पर्धेचा पहिला सामना ओमान आणि पपुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि क्रिस गाफने मैदानातले अंपायर असतील. कुमार धर्मसेना 2019 वर्ल्ड कप फायनलमध्येही अंपायर होते. मॅच रेफ्री : डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, जवागल श्रीनाथ अंपायर : क्रिस ब्राउन, अलीम दार, कुमार धर्मसेना, मराइस इरासमस, क्रिस गाफने, माइकल गॉ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, नितिन मेनन, अहसन रजा, पॉल रायफेल, लँगटन रूसेरे, रॉड टकर, जोएल विलसन, पॉल विलसन
First published:

Tags: Icc, T20 world cup

पुढील बातम्या