मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये पहिल्याच दिवशी मोठा Upset, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला हरवणाऱ्या बांगलादेशला धक्का

T20 World Cup मध्ये पहिल्याच दिवशी मोठा Upset, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला हरवणाऱ्या बांगलादेशला धक्का

फोटो सौजन्य : ICC T20 World Cup

फोटो सौजन्य : ICC T20 World Cup

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. स्कॉडलंडने बांगलादेशचा (Bangladesh vs Scotland) 6 रनने पराभव केला आहे.

    अल अमेरत, 17 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. स्कॉडलंडने बांगलादेशचा (Bangladesh vs Scotland) 6 रनने पराभव केला आहे. स्कॉडलंडने दिलेल्या 141 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 134 रनच करता आले. बांगलादेशकडून मुशफिकरु रहीमने (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 38 रनची खेळी केली, तर कर्णधार महमदुल्लाह (Mahamadullah) 23 रन करून आऊट झाला. स्कॉडलंडकडून ब्रॅडली व्हीलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर क्रिस ग्रीव्हजला 2 विकेट घेण्यात यश आलं. जॉश डेव्ही आणि मार्क वॅट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर स्कॉडलंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 140 रन केले. क्रिस ग्रीव्हजने सर्वाधिक 45 रन तर मुनसीने 29 आणि मार्क वॅटने 22 रनचं योगदान दिलं. बांगलादेशकडून मेहेदी हसनने सर्वाधिक 3 विकेट पटकावल्या. मुस्तफिजूर आणि शाकिब अल हसनला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं आणि सैफुद्दीननला एक विकेट मिळाली. बांगलादेशने काही महिन्यांपूर्वीच आपल्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा टी-20 सीरिजमध्ये 4-1 ने आणि न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव केला होता. बड्या टीमना हरवल्यानंतर टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशची टीम आत्मविश्वास घेऊन आली होती, पण पहिल्याच सामन्यात स्कॉडलंडने बांगलादेशला धक्का दिला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला हा पहिलाच उलटफेर आहे. सुपर-12 मध्ये पोहोचण्यासाठी आता बांगलादेशला ओमान आणि पपुआ न्यू गिनीविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, T20 world cup

    पुढील बातम्या