Home /News /sport /

केन विल्यमसनच्या 'त्या' निर्णयावर नाराज दिसला R Ashwin, ट्विट करत म्हणाला...

केन विल्यमसनच्या 'त्या' निर्णयावर नाराज दिसला R Ashwin, ट्विट करत म्हणाला...

r ashwin

r ashwin

टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडवर 5 विकेट्सनं इंग्लंडवर विजय मिळवला. पण अश्विनने विल्यमसनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडवर 5 विकेट्सनं (NZ vs ENG T20 World Cup) विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विनने (r ashwin) केलेले ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यातील टॉस दरम्यान, किवींचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson)घेतलेल्या निर्णयावर शंका उपस्थित केली होती. झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात टॉसदरम्यान, विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान त्याने प्रसंगाची निकड लक्षात घेऊन काही महत्त्वाचे निर्णयही घेतले. यामध्ये ग्लेन फिलिप्सला एक ओव्हर टाकणे हा त्याचा महत्त्वाचा निर्णय होता. मात्र, टीम इंडियाचा अश्विन त्याच्या या निर्णयाने बुचकळ्यात पडला असल्याचे पाहायला मिळाले. उपांत्य फेरीच्या सामन्यात फिलिप्सच्या गोलंदाजीच्या निर्णयावर ट्विट करून त्याने आपले मतही मांडले आहे. खरे तर कालच्या सामन्यात जेव्हा दोन डावखुरे फलंदाज इंग्लंडसाठी मैदानात फलंदाजी करत होते, तेव्हा विल्यमसनने एक चाल करून मिचेल सँटनरऐवजी ग्लेन फिलिप्सला गोलंदाजी करायला लावले. अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की सँटनरला आतापर्यंत डावखुरा फलंदाजांविरुद्ध कोणतेही यश मिळालेले नाही. सँटनरचे हे अपयश पाहून विल्यमसनने पार्टटाइम स्पिनर फिलिप्सला गोलंदाजी करण्याचा विचार केला. मात्र, विल्यमसनचा हा विचार येथे फसाला. किवींच्या संघासाठी तो महागात पडला. कालच्या सामन्यात त्याने फक्त एक षटक टाकले, त्या दरम्यान त्याने 11 धावा दिल्या. त्याचवेळी अनुभवी फिरकीपटू सँटनरलाही केवळ एक षटक टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने आठ धावा केल्या. विल्यमसनच्या या निर्णयावर भारताच्या अनुभवी फिरकीपटूने आपले मत मांडले आहे. त्याने , 'सँटनरने एका षटकात 8 धावा खर्च केल्या. समोर दोन डावखुरे फलंदाज होते आणि सँटनरने कधीच डावखुऱ्या फलंदाजांची विकेट घेतली नाही, त्यामुळे थोडे ऑफ-स्पिन कसे करायचे हे जाणणाऱ्या कीपरकडे सोपवले. आशा आहे की या 11 धावा सामन्यात निर्णायक ठरणार नाहीत. अशा आशयाचे ट्विट आर अश्विनने करत विल्यमसनच्या निर्णयाव अस्वस्था व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडवर 5 विकेट्सनं (NZ vs ENG T20 World Cup) विजय मिळवला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं 2019 साली वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. न्यूझीलंडच्या विजयात डॅरेल मिचेलसह (Daryl Mitchell) जेम्स नीशम (James Neesham)चं महत्त्वाचं योगदान होतं. त्यानं 11 बॉलमध्ये 27 रनची खेळी करत मॅचचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकवलं.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: R ashwin, T20 cricket, T20 league, T20 world cup

    पुढील बातम्या