• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • अन् पाकच्या कर्णधाराची खेळी पाहताना दिसले टीम इंडियाचे क्रिकेटर; Photo व्हायरल

अन् पाकच्या कर्णधाराची खेळी पाहताना दिसले टीम इंडियाचे क्रिकेटर; Photo व्हायरल

अन् पाकच्या कर्णधाराची खेळी पाहतच राहिले टीम इंडियाचे क्रिकेटर; Photo व्हायरल

अन् पाकच्या कर्णधाराची खेळी पाहतच राहिले टीम इंडियाचे क्रिकेटर; Photo व्हायरल

वॉर्मअम मॅचमध्ये((Warm Up Match) ) पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध (PakvsWI)सात गडी राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान, टीम इंडिया काही खेळाडू सामना पाहताना दिसले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 Worldcup) मध्ये भारत आणि पाकिस्तान(INDvsPAk) 24 ऑक्टोबर रोजी एकमेकांविरुद्ध समोर येणार आहेत. दोन्ही संघांची वॉर्मअम मॅच (Warm Up Match) खेळवण्यात आली. दुबईतील मैदानावर दोन्ही सामने झाले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला आणि भारता इंग्लंडविरुद्धचा सामना 7 विकेट आणि एक ओव्हर राखून विजय झाला आहे. या सामन्यादरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकच्या खेळाडूंचा खेळ कसा आहे हे अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध वॉर्मअम मॅच खेळण्यासाठी मैदानावर पोहोचली, त्याच वेळी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आपला वॉर्मअम मॅच खेळत होता. या दरम्यान भारतीय खेळाडू, कोचिंग स्टाफ उत्सुकतेने पाकिस्तान संघाचा खेळ पाहत होते. याचेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कोच रवि शास्‍त्री, मेटॉर एमएस धोनी(MS Dhoni) सह भुवनेश्‍वर कुमार, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर दिसत आहेत. जेव्ह टीम इंडिया मैदानात आहे तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता, तेव्हा भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी त्याची फलंदाजी पाहताना दिसले. या सामन्यात बाबर आझमने 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार अर्धशतक झळकावले आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयात मोठे योगदान दिले. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये होणार आहे. या मॅचमधून दोन्ही टीम या स्पर्धेतील अभियानाचा शुभारंभ करतील. टी20 वर्ल्ड कपमध्ये  या स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व 5 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता.
  त्याचबरोबर 2012,  2014 आणि 2016 मध्येही टीम इंडियामं विजय मिळवला आहे. दोन्ही देशांच्या टीम 2 वर्षांनी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची लढत झाली होती. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानवर 89 रननं दणदणीत विजय मिळवला होता.
  Published by:Dhanshri Otari
  First published: