Home /News /sport /

T20 World Cup 2021 : जय शाहंची 'मोदी स्टाईल', रात्री 9 वाजता करणार सगळ्यात 'मोठी' घोषणा

T20 World Cup 2021 : जय शाहंची 'मोदी स्टाईल', रात्री 9 वाजता करणार सगळ्यात 'मोठी' घोषणा

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पावलावर पाऊल ठेवलं आहे. जय शाह आज रात्री 9 वाजता टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करणार आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जेव्हा संध्याकाळनंतर जनतेशी संवाद साधायला येतात तेव्हा त्याबाबत मोठा सस्पेन्स आणि कुतुहल असतं. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. जय शाह आज रात्री 9 वाजता टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मादेखील (Chetan Sharma) असणार आहेत. कोणाला मिळणार संधी? 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे. 2007 नंतर भारताला एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तसंच कर्णधार विराट कोहलीला आपल्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यंदा तरी ट्रॉफीचा हा दुष्काळ संपेल, अशी विराट आणि भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांचं स्थान पक्कं आहे, त्यामुळे 15 खेळाडूंच्या टीममध्ये आणखी कोणते 5 जण असतील, याचा सस्पेन्स कायम आहे. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्याशिवाय टीममध्ये 5 स्पेशलिस्ट बॅट्समन आहे. त्यामुळे अधिकचा बॅट्समन निवडायची वेळ आली तर या स्पर्धेत शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ आहेत. याशिवाय आणखी दोन फास्ट बॉलरना निवडावं लागणार आहे, यात शार्दुल ठाकूर, दीपक चहर, टी नटराजन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यात स्पर्धा आहे. स्पिन ऑलराऊंडरच्या रेसमध्ये अक्षर पटेल, कृणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर आहे. पण सुंदरला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तो आयपीएलही खेळणार नाही. अशात दुसरा स्पिन बॉलर म्हणून राहुल चहर, वरुण चक्रवर्ती आणि अश्विनच्या नावाचा विचार होऊ शकतो. अश्विन बराच काळ आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलेला नाही, पण त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. वरुण चक्रवर्तीच्या फिटनसेवर वारंवार प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दोनवेळा फिटनेसमुळे वरुणला आंतरराष्ट्रीय सीरिजमधून अखेरच्या क्षणी माघार घ्यावी लागली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या