मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021 : ...म्हणून धोनीला मेंटर केलं, दादाने सांगितलं मास्टरस्ट्रोक मागचं कारण

T20 World Cup 2021 : ...म्हणून धोनीला मेंटर केलं, दादाने सांगितलं मास्टरस्ट्रोक मागचं कारण

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये एमएस धोनीची (MS Dhoni) मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये एमएस धोनीची (MS Dhoni) मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने धोनीचे धन्यवाद दिले. धोनीचा अनुभव टीम इंडियाच्या कामाला येईल. तोदेखील टीम इंडियाची मदत करायला तयार आहे, असं गांगुली म्हणाला आहे.

'धोनीच्या अनुभवाचा फायदा करू घेण्यासाठी त्याला टीममध्ये निवडण्यात आलं आहे. त्याने बीसीसीआयने दिलेली ऑफर स्वीकारली, याबद्दल त्याचे धन्यवाद,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.

एमएस धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार आहे. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.

धोनीला मेंटर बनवण्यावरून वाद

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार धोनीच्या नियुक्तीविरोधात परस्पर हितसंबंधांची (कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेश असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला पत्र लिहून ही तक्रार केली आहे. एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, त्यामुळे हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा आहे, असा दावा संजीव गुप्ता यांनी केला आहे.

संजीव गुप्ता यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे तक्रार केली आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या संविधान नियम 38 (4) चा दाखला दिला आहे. या नियमानुसार एक व्यक्ती दोन पदांवर असू शकत नाही, असं संजीव गुप्ता यांनी तक्रारीत म्हणलं आहे. यानंतर आता बीसीसीआय याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

First published:

Tags: BCCI, MS Dhoni, Sourav ganguly, T20 world cup