मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव

T20 World Cup AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव

ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) विजयाने सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia vs South Africa) 5 विकेटने पराभव केला.

  • Published by:  News18 Desk

अबूधाबी, 23 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) विजयाने सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia vs South Africa) 5 विकेटने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 119 रनचं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला 19.4 ओव्हरचा सामना करावा लागला. एवढ्या छोट्या आव्हानाचा बचाव करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्रनी टिच्चून बॉलिंग केली, पण ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसनने नाबाद 24 रनची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 35 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्कियाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रबाडा, केशव महाराज आणि तबरेज शम्सीला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेची (Australia vs South Africa) बॅटिंग गडगडली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 118/9वर रोखलं. मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड आणि एडम झम्पा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने सर्वाधिक 40 रनची खेळी केली, तर रबाडा 19 रनवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) या आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप न जिंकणाऱ्या मॅचनं सुपर 12 चा थरार सुरु झाला. या दोन्ही टीमचा ग्रुप 1 मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसह वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका या 6 टीमचा समावेश आहे. या टीममधील सर्वच टीम धोकायदायक असल्यानं प्रत्येक मॅच सर्व टीमसाठी महत्त्वाची आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक टीमला पाचपैकी किमान 3 मॅच जिंकणे आवश्यक आहे.

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं स्पिन बॉलर अ‍ॅस्टन अगरचा समावेश केलेला नाही.

First published:

Tags: T20 world cup