Home /News /sport /

T20 World Cup 2021 : टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, धोनी झाला मेंटर!

T20 World Cup 2021 : टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, धोनी झाला मेंटर!

टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा (T20 World Cup Team India) करण्यात आली आहे. विराटचे (Virat Kohli) हे 15 शिलेदार टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीम इंडियाची घोषणा (T20 World Cup Team India) करण्यात आली आहे. विराटचे (Virat Kohli) हे 15 शिलेदार टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपचा 14 वर्षांचा वनवास संपवतील, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी 2007 साली भारताने पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. वर्ल्ड कपसाठी 15 जणांच्या टीमचा समावेश करण्यात आला असला, तरी कोरोनाचं संकट आणि खेळाडूंच्या दुखापतींची टांगती तलवार असल्यामुळे टीममध्ये काही राखीव खेळाडूही ठेवण्यात आले आहे. मागच्या 4 वर्षांपासून भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममधून बाहेर असलेल्या अश्विनचं (R Ashwin) भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर एमएस धोनीची मेंटर म्हणूून नियुक्ती झाली आहे. भारतीय टीम विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर टी-20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 14 नोव्हेंबरला फायनल होणार आहे. भारताचा पहिलाच मुकाबला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे. तर टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. तर 5 नोव्हेंबरला क्वालिफायरमधून आलेल्या ग्रुप बीच्या टॉप टीमविरुद्ध आणि 8 नोव्हेंबरला क्वालिफायरच्या ग्रुप एच्या दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या टीमसोबत भारताची लढत होईल. टीम इंडियाचं वेळापत्रक 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-बी क्वालिफायर टॉप टीम 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-ए क्वालिफायर दुसरी टीम 10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल 11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल 14 नोव्हेंबर- फायनल
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या