• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Anthem रिलीज, विराट-पोलार्ड वेगळ्याच अवतारात! VIDEO

T20 World Cup Anthem रिलीज, विराट-पोलार्ड वेगळ्याच अवतारात! VIDEO

टी-20 वर्ल्ड कपच्या अधिकृत एन्थम (T20 World Cup 2021 Anthem) आयसीसीने लॉन्च केलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावर शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वेगळ्याच अवतारात दिसत आहे.

 • Share this:
  दुबई, 23 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या अधिकृत एन्थम (T20 World Cup 2021 Anthem) आयसीसीने लॉन्च केलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावर शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्यासह इतर खेळाडू वेगळ्याच अवतारात दिसत आहेत. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, तर फायनल 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये होईल. बॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी (Amit Trivedi) यांच्या दिग्दर्शनात ही एनिमेटेड फिल्म तयार करण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, कायरन पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि अफगाणिस्तानच्या राशिद खान (Rashid Khan) यांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनो महामारीनंतर क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेत 16 देश सहभागी होणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन 17 ऑक्टोबरला ओमानमध्ये होणार आहे. ओमान आणि पपुआ न्यू गिनी यांच्यात क्वालिफायरचा पहिला सामना होईल. मस्कटच्या ओमान क्रिकेट अॅकेडमीमध्ये पहिला सामना खेळवला जाईल. ...तर अफगाणिस्तानला खेळता येणार नाही T20 World Cup, ICC तातडीची बैठक घेणार! 2007 साली सुरू झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज सर्वाधिक दोनवेळा चॅम्पियन राहिली आहे, तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांना प्रत्येकी एक-एक वेळा विजय मिळाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने हा वर्ल्ड कप संपल्यानंतर आपण टी-20 क्रिकेटचं कर्णधारपद सोडणार आहोत, हे आधीच सांगितलं आहे. रहस्य उलगडलं : 'या' व्यक्तीच्या सल्ल्यानंतर विराट कोहलीनं सोडली कॅप्टनसी
  Published by:Shreyas
  First published: