मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...तर पाकला हलक्यात घेऊ नका; माजी दिग्गज क्रिकेटपटूचा टीम इंडियाला मौलिक सल्ला

...तर पाकला हलक्यात घेऊ नका; माजी दिग्गज क्रिकेटपटूचा टीम इंडियाला मौलिक सल्ला

तर पाकला हलक्यात घेऊ नका; माजी दिग्गज क्रिकेटपटूचा टीम इंडियाला मौलिक सल्ला

तर पाकला हलक्यात घेऊ नका; माजी दिग्गज क्रिकेटपटूचा टीम इंडियाला मौलिक सल्ला

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचआधी टीम इंडियाचे माजी दिग्गच क्रिकेटपटू दिग्गज गोलंदाज अजित आगकरने (Ajit Agarkar) भारतीय संघाला एक मौलिक सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासुन सुरुवात होत आहे, पण स्पर्धेचा सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचआधी टीम इंडियाचे माजी दिग्गच क्रिकेटपटू दिग्गज गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) भारतीय संघाला एक मौलिक सल्ला दिला आहे.

आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने सामने असतील. 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करतील. तत्पूर्वी, आगरकरने टीम इंडियाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.

आगकरचा टीम इंडियाला मौलिक सल्ला

''भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही मॅच असते दोन्ही संघावर दबाव असतो. सध्याचा भारतीय संघ पाहता पाकिस्तानचं आव्हान मोठं नसलं तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारताने करु नये. हा टी20 सामना असल्याने कधीही काहीही बदलू शकते.'' त्यामुळे, दोन्ही संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान जास्त मोठं नसलं तरी भारताला पाकिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही. असे मत आगरकरांनी व्यक्त केले आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत.

तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच हरला नाही

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या, यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही टीम इंडियाला विजय मिळाला. 2016 साली भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरचा टी-20 वर्ल्ड कपचा सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केले होते, भारताने हा सामना 4 विकेट गमावून जिंकला होता.

First published:
top videos

    Tags: T20 cricket, T20 world cup, Team india