Home /News /sport /

T20 World Cup 2020: क्रिकेट विश्वातील मोठी बातमी; कोरोनामुळे सामना लांबणीवर

T20 World Cup 2020: क्रिकेट विश्वातील मोठी बातमी; कोरोनामुळे सामना लांबणीवर

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात मोठा फटका बसला आहे.

    नवी दिल्ली, 20 जुलै : अद्यापही कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. परिणामी अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात आहेत. कोरोनाच्या महासाथीचा परिणाम सिनेक्षेत्रासह अनेक क्षेत्रांवर झाला आहे. क्रिकेट विश्वावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ICC mens T20 World Cup 2020 पुढे ढकल्यात आली आहे. क्रिकेट प्रेमी या सामन्यांची मोठ्या आवडीने प्रतीक्षा करीत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा कहर असल्याने विश्वचषक सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आज आयसीसीच्या विश्वचषक बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. हे वाचा-एकेकाळी विराटवर फिदा असणाऱ्या ‘या’ सुंदर महिला क्रिकेटपटूने केला साखरपूडा! अद्याप पुढील तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विश्वचषक स्पर्धा  आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर गेल्याने खेळाडूंमध्ये निराशा आहे. मात्र कोरोनासारख्या महासाथीत आजाराच फैलाव टाळण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. हे वाचा-असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशा परिस्थितीत विश्वचषक घेणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी सामना पुढे ढकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यानंतरच तरुणांच्या अत्यंत आवडीची स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या