मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: टीम इंडिया करणार अनुभवी खेळाडूला बाहेर, न्यूझीलंडविरुद्ध विराटला घ्यावा लागेल मोठा निर्णय!

T20 World Cup: टीम इंडिया करणार अनुभवी खेळाडूला बाहेर, न्यूझीलंडविरुद्ध विराटला घ्यावा लागेल मोठा निर्णय!

Team India

Team India

न्यूझीलंड विरुद्ध रविवारी होणारी मॅच तर 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. अशातच टीम इंडियासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्यासह(Hardik Pandya ) आणखी एक खेळाडू डोकेदुखी ठरत आहे.

दुबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तान विरुद्धची मॅच (India vs Pakistan) गमावल्यानंतर टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. न्यूझीलंड विरुद्ध रविवारी होणारी मॅच तर 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. अशातच टीम इंडियासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्यासह आणखी एक खेळाडू डोकेदुखी ठरत आहे. तो खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) .

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा संधी देऊ नये अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. एकूणच त्याच्या कामगिरीवरून सध्या तो टीमसाठी धोकादायक असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ नये असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

भुवनेश्वर कुमार प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्यास पात्र नाही

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने 3 ओव्हर्स बॉलिंग केली. यामध्ये भुवीने 25 धावा पाकिस्तानला काढण्याची संधी दिली. इतकच नाही तर एकही विकेट घेण्यात त्याला यश मिळालं नाही. त्यामुळे भुवीला पुन्हा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात संधी देणं हे टीमसाठी धोक्याचं ठरू शकतं असा असा तर्क लावण्यात येत आहे.

खराब फॉर्मची किंमत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा चुकवावी लागली. आता तिच चूक पुन्हा एकदा कोहली करू नये असे क्रिकेट जगतात सांगण्यात येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमधील भुवनेश्वरच्या कामगिरीनंतर त्याच्या निवडीवर जाहीर चर्चा झाली आणि अनेक तज्ज्ञांनी त्याला आपल्या संघात ठेवले नाही, पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. भुवनेश्वरला 11 सामन्यात 42 षटकात केवळ 6 विकेट घेता आल्या होत्या.

निवडकर्त्यांकडून मोठी चूक झाली

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांची टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत ना वेग आहे ना तो आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकला.

पाकिस्तानसोबत झालेल्या लढतीत भुवनेश्वर कुमारला वेग पकडता आला नाही. यादरम्यान भुवीला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या या खराब कामगिरीनंतर तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड करु नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात एक दिलासादायक बाब आहे. ती म्हणजे ब्लॅक कॅप्स संघाचा घातक गोलंदाज मार्टिल गुप्टिल आणि गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाली आहे. मात्र, संघातील खराब फार्मातील गोलंदजांमुळे टीम इंडियाला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा सतर्क राहावं लागणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भुवी पुन्हा खेळला तर टीम इंडियाच्या पराभवाचं कारण तो बनू शकतो. त्यामुळे त्याऐवजी शार्दूलला संधी द्यावी असा अनेकांचं म्हणणे आहे.

First published:

Tags: Hardik pandya, Shardul Thakur, T20 cricket, T20 league, T20 world cup