• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20WC: ...म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला डच्चू; BCCI ने दिले कारण

T20WC: ...म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला डच्चू; BCCI ने दिले कारण

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार( Suryakumar Yadav) यादवऐवजी इशान किशनचं (Ishan Kishan) टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार( Suryakumar Yadav) यादवऐवजी इशान किशनचं (Ishan Kishan) टीममध्ये पुनरागमन झालं आहे. हा बदल का करण्यात आला याचे कारण बीसीसीआयने नुकतंच स्पष्ट केले आहे. पाठीच्या दुखण्यामुळे सूर्यकुमार यादवला त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सूर्यकुमारला विश्रांतीचा सल्ला दिला असून तो हॉटेलमध्येच थांबला आहे. अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.

  भारतीय टीममध्ये दोन बदल

  या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारऐवजी शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवऐवजी इशान किशनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये ईश सोढी आणि मिचेल सॅन्टनर हे दोन स्पिनर असल्यामुळे विराटने डावखुरा बॅट्समन असलेल्या ईशान किशनला संधी दिल्याचं सांगितलं जात आहे.

  भारतीय टीम

  रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ईशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
  Published by:Dhanshri Otari
  First published: