भारत-न्यूझीलंडमध्ये आजपासून टी20 मालिका

भारत-न्यूझीलंडमध्ये आजपासून टी20 मालिका

आतापर्यंत भारताला टी-20मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही

  • Share this:

01 नोव्हेंबर: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होते आहे. एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता टी-20 मध्येही वर्चस्व गाजवण्याची संधी भारतीय टीमला आहे.

आतापर्यंत भारताला टी-20मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे पहिला टी-20 विजय नोंदवण्याची संधीही भारताकडे आहे. दिल्लीत होणाऱ्या आजच्या सामन्यानंतर आशिष नेहराही क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. निवृत्ती अगोदर घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळू देण्याची विनंती नेहरानं केली होती. त्यामुळे आज आशिष नेहराचा संघात समावेश होऊ शकतो. भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला होता. त्यामुळे भारताकडून या मालिकेत देशाच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत

या सामन्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 08:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading