T20 Mumbai League : अर्जुन तेंडुलकरला गवसला सुर, आकाश टायगर्सची विजयी घौडदौड

आकाश टायगर्स एमडब्लूएस यांनी यंदा चांगली कामगिरी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 07:56 PM IST

T20 Mumbai League : अर्जुन तेंडुलकरला गवसला सुर, आकाश टायगर्सची विजयी घौडदौड

मुंबई, 20 मे : आयपीएलनंतर सध्या मुंबईत चर्चा आहे ती मुंबई क्रिकेट लीगची. मुंबईतील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशच्या वतीने मागच्या वर्षीपासून मुंबई टी-20 लीगलला सुरवात झाली. दरम्यान आपल्या पदार्पणातच महत्त्वाची विकेट घेत, आपल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या अर्जुन तेंडुलकरनं आज नॉर्थ मुंबई पँथर्स यांच्याविरोधात गोलंदाज आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.

आकाश टायगर्स एमडब्लूएस यांनी आपला पहिलाचा सामना जिंकत विजय घौजदौड सुरु केली होती. दरम्यान पहिल्या सामन्यात ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट यांना नमवनू 5 विकेटनं सामना जिंकला. मात्र त्यानंतर मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची चांगलीच धुलाई झाली होती. सोबो सुपर सॉनिक यांच्या विरोधात झालेल्या सामन्यात फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा केल्या. मात्र, या अपयशातून धडा घेत अर्जुनने सोमवारी कमबॅक केले.आकाश टायगर्स आणि नॉर्थ मुंबई पँथर्स यांच्यात सोमवारी सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पँथर्सने 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या. अर्जुननं त्यांची मधली फळीच नेस्तानाबूत केली. त्याने 3 षटकांत 27 धावांत 3 विकेट टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना, आकाश टायर्गसनं 4 विकेटनं विजय मिळवला. दरम्यान यात सलामीला आलेल्या अर्जुननं 24 चेंडूत 4 चौकार लगावत 28 धावा केल्या. तर, शाम मुलानी यांनं 60 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर आकाश टायर्गसनं हा सामना जिंकला.

Loading...

दरम्यान , अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली.मुंबई क्रिकेट असोसिएशनं 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. या लीगमुळं मुंबईमधील युवा खेळाडूंना एक नवीन संधी मिळाली आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता.

वाचा- World Cup : पंचांना एका सामन्यासाठी दिलं जातं इतकं वेतन

वाचा- इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल

वाचा- वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आहे 'मास्टर प्लॅन', सराव नव्हे तर 'ही' आहे योजना!


VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...