India vs West Indies T20 Live Score: भारताने फोडले विजयी फटाके, विराटला दिलं बर्थडे गिफ्ट

India vs West Indies T20 Live Score: भारताने फोडले विजयी फटाके, विराटला दिलं बर्थडे गिफ्ट

विंडीजच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. फलंदाजांमधून फॅबियन अलनने सर्वाधिक २७ धावा केल्या

  • Share this:

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने विंडीजवर ५ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने एका सामन्याची आघाडी घेतली आहे. या सामन्याचा सामनावीर ठरला कुलदीप यादव. कुलदीपने विंडीजचे महत्त्वपूर्ण तीन गडी बाद केले. गोलंदाजीमध्ये कुलदीपने भार सांभाळला तर फलंदाजीमध्ये कार्तिक टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. दिनेशने मोक्याच्याक्षणी भारताचा डाव सांभाळत संघाल विजय मिळवून दिला. विंडीजप्रमाणे भारताचे सलामीचे फलंदाज धावा करण्यात सपशेल अपयशी ठरले. भारत हा सामना हरतो की काय अशा अवस्थेत असताना दिनेशने संयमी खेळ खेळत भारताला विजय मिळवून दिला.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या टी२० सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी अपयशी कामगिरी केली. त्यामुळे विंडीजला फक्त १०९ धावांचा टप्पा गाठता आला. भारताला १२० चेंडूत ११० धावांचे आव्हान देत गोलंदाजीसाठी मैदानात उतरले. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजांनी त्यांची बाजू सांभाळत विंडीजच्या संघाला अवघ्या १०९ धावात रोखले. एकट्या कुलदीप यादवने ३ गडी बाद केले. तर खलील अहमद, कृणाल पांड्या, उमेश यादव, जसप्रीत बुमराह प्रत्येकी एक गडी बाद केले.

कृणाल आणि खलीलने टी२० कारकिर्दीतील पहिला गडी बाद करत खाते उघडले. यावेळी विंडीजच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. फलंदाजांमधून फॅबियन अलनने सर्वाधिक २७ धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

First published: November 4, 2018, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading