T10 Cricket League : सनी लिओनी दिसणार क्रिकेटच्या मैदानात, दिग्गजांबरोबर 'या' लीगमध्ये होणार सामिल

T10 Cricket League : सनी लिओनी दिसणार क्रिकेटच्या मैदानात, दिग्गजांबरोबर 'या' लीगमध्ये होणार सामिल

झहीर खान, शोएब मलिकसारख्या दिग्गजांबरोबर सनी दिसणार मैदानात.

  • Share this:

दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 क्रिकेट हा सर्वात प्रसिध्द फॉरमॅट झाला आहे. त्यामुळं आयपीएलपासून ते विविध लीगपर्यंत क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळं आता वेगळा पर्याय म्हणून टी-10 लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. दुबईमध्ये टी-10 क्रिकेट लीग (T10 Cricket League) ही स्पर्धा सुरू केली जाणार आहे. 14 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, या लीगची तयारी पूर्ण झाली आहे.

दरम्यान टी-10 लीगमधील दिल्ली बुल्स या संघानं एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दिल्ली बुल्स संघानं आपली जर्सी, गाणं आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांची घोषणा करण्यात आली आहे. दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या जर्सीचे अनावरण केले.

दिल्ली बुल्स या संघासोबत पहिल्यांदाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री सनी लिओनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं पहिल्यांदाच सनी लिओनी हिची पहिल्यांदाच क्रिकेट संघाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा इयॉन मॉर्गन या संघाचा कर्णधार असणार आहे. तर, या संघात शोएब मलिक, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी, जहीर खान यांसारखे दिग्गज तर, युवा खेळाडूही दिल्ली संघाकडून खेळणार आहेत.

एकीकडे आयपीएलमुळे टी-20 क्रिकेट प्रसिध्दीच्या जोतात आल्यानंतर आता टी-10 क्रिकेटची चर्चा आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं यंदा 14 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी शारजाहमध्ये हा सामना झाला होता. यावर्षी युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या टी-10 लीगमध्ये एकूण 8 संघ सामिल होणार आहेत.

दिल्ली बुल्सचे सहमालिक रिझवान साजन यांनी, “संघाची जर्सी आणि गाणं यांचे अनावरण केल्यामुळं चांगले वाटत आहे. आमचा संघ नवा आहे, त्यामुळं चांगल्या जोशात आहे. त्याशिवाय सनी लिओनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्यामुळं संघाला फायदा होईल”, असे सांगितले. शोएब मलिक या संघाचा माजी कर्णधार असणार आहे.

‘दिल्ली संघासोबत जोडले गेले याचा आनंद’

जर्सीचे अनावरण करत असताना सनी लिओनीनं, “चांगल्या जोशमध्ये असलेल्या या संघासोबत जोडले गेल्याचा आम्हाला आनंद आहे. मला या जर्सीचा रंगही प्रचंड आवडला आहे. मी या संघाला टी-10 लीगसाठी खुप शुभेच्छा देते”, असे सांगितले.

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: November 1, 2019, 7:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading