मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाची अवस्था पाहून पॉण्टिंगला आली धोनीची आठवण, म्हणाला...

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाची अवस्था पाहून पॉण्टिंगला आली धोनीची आठवण, म्हणाला...

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंगने (Ricky Pointing) ऑस्ट्रेलियाची कमजोरी सांगितली आहे. ऑस्ट्रेलियाकडे धोनी (MS Dhoni) किंवा हार्दिक पांड्यासारखा (Hardik Pandya) फिनिशर नसल्याचं पॉण्टिंग म्हणाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंगने (Ricky Pointing) ऑस्ट्रेलियाची कमजोरी सांगितली आहे. ऑस्ट्रेलियाकडे धोनी (MS Dhoni) किंवा हार्दिक पांड्यासारखा (Hardik Pandya) फिनिशर नसल्याचं पॉण्टिंग म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाला मधल्या किंवा खालच्या फळीत विकेट कीपिंग करणारा विश्वासू बॅट्समन सापडला, तर एका दगडात दोन पक्षी मारता येतील, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली.

रिकी पॉण्टिंग क्रिकेट.कॉम.एयू सोबत बोलत होता. 'ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे, यासाठी तीन-चार ओव्हर खेळून 50 रन करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. धोनीने त्याच्या पूर्ण करियरमध्ये हेच केलं. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डही याच यादीत येतात. हे दोघं आयपीएलमध्ये त्यांच्या टीमसाठी आणि त्यांच्या देशासाठीही अशीच कामगिरी करून मॅच जिंकवून देतात,' असं पॉण्टिंग म्हणाला.

'ऑस्ट्रेलियाकडे चांगला फिनिशर नाही, कारण टीमचे सगळे सर्वोत्तम बॅट्समन बिग बॅश लीगमध्ये सुरुवातीच्या चार क्रमांकावर खेळतात,' असं पॉण्टिंगने सांगितलं. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), मिचेल मार्श (Mitchell Marsh) किंवा मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यांच्यापैकी कोण चांगला फिनिशर होऊ शकतो, असं पॉण्टिंगला विचारलं तेव्हा त्याने स्टॉयनिसने दिल्ली कॅपिटल्ससाठी ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावली, असं उत्तर दिलं.

'मी मागच्यावर्षी मार्कस स्टॉयनिसला दिल्लीसाठी बॅटिंग करताना बघितलं. त्याने बिग बॅश लीगमध्येही काही सामन्यांमध्ये ओपनिंग केली, पण आपल्याला असा खेळाडू पाहिजे, जो फिनिशरची भूमिका बजावेल. स्टॉयनिसने दिल्लीला दोन ते तीन मॅच आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकवून दिल्या,' असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं. टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. कोरोनाची स्थिती बघता ही स्पर्धा भारतात होईल का युएईमध्ये याबाबत निर्णय झालेला नाही.

First published:

Tags: Australia, Cricket news, Hardik pandya, MS Dhoni, T20 world cup