• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : नवख्या नामिबियाचा आर्यलंड दे धक्का; 8 गडी राखून मिळवला मोठा विजय

T20 World Cup : नवख्या नामिबियाचा आर्यलंड दे धक्का; 8 गडी राखून मिळवला मोठा विजय

चांगल्या सलामीनंतरही आर्यलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बिनबाद 62 अशी आश्वासक सुरुवात झाल्यानंतरही आर्यलंडची फलंदाजी नंतर ढेपाळली.

 • Share this:
  शारजा, 22 ऑक्टोबर : यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) नवखे संघ आपली चमक दाखवत आहेत. स्कॉडलंडने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर आता नामिबियाने आर्यलंड विजय मिळवला आहे. स्पर्धेतील 11 व्या सामन्यात आज नामिबिया आणि आर्यलंड या संघांमध्ये लढत होती. या सामन्यात नामिबियाने आर्यलंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आर्यलंडने दिलेलं 126 धावांचं आव्हान नामिबियाने 2 गड्यांच्या मोबदल्यातच 18.3 षटकात आरामात पार केलं. चांगल्या सलामीनंतरही आर्यलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बिनबाद 62 अशी आश्वासक सुरुवात झाल्यानंतरही आर्यलंडची फलंदाजी नंतर ढेपाळली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग (38 धावा) आणि केविन ओब्रायन (25 धावा) ही जोडी तंबूत परतल्यानंतर कर्णधार अँड्र्यू बालबीर्नीची (21 धावा) धावांची खेळी वगळता नामिबियाच्या गोलंदाजीसमोर आर्यलंड फलंदाजांचा टिकाव लागला नाही. आर्यलंडच्या 7 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. नामिबियाच्या जॅन फ्रिलिंकने सर्वाधिक तीन गडी बाद केले. हे वाचा - IPL 2022 रिटेन्शन पॉलिसीबाबत महत्त्वाची माहिती समोर; CSKच्या चाहत्यांना दिलासा तर 126 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नामिबिया संघाला 25 धावांवर पहिला धक्का बसला क्रेग विल्यम्स 15 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत एकेही-दुहेरी धावा काढत आर्यलंडला आणखी यश मिळू दिलं नाही. त्याने नाबाद अर्धशतक (53) झळकावले त्याला मधल्या फळीतीस डेव्हिड विसेने 14 चेंडूत 28 धावा काढून चांगली साथ दिली. त्यामुळं नामिबियानं हा सामना सहज जिंकला.
  Published by:News18 Desk
  First published: