मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'या स्टार खेळाडूच्या नावाची चर्चासुद्धा नाही', BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

'या स्टार खेळाडूच्या नावाची चर्चासुद्धा नाही', BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

टीम इंडिया का हरली?

टीम इंडिया का हरली?

यूएईमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारतीय टीमची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यामुळे भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत.

मुंबई :  टी-20 वर्ल्ड कप, तसंच 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) या टीम्सविरुद्ध होणार असलेल्या 6 टी-20 मॅचेससाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने भारतीय टीमची घोषणा केली. या टीममध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे; मात्र ज्यांची हमखास निवड होईल अशी अपेक्षा अनेकांना होती, अशा अनेक खेळाडूंचा या टीममध्ये समावेश नाही. त्यामुळे त्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच, निवड न झालेल्या खेळाडूंचे फॅन्सही नाराज झाले आहेत. दरम्यान, संजू सॅमसनचा या टीममध्ये हमखास समावेश होईल, अशी चर्चा असताना त्याच्या नावावर निवड समितीच्या बैठकीत चर्चाही झाली नसल्याचं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. नुकत्याच यूएईमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारतीय टीमची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यामुळे भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत. आता भारतीय टीम आगामी टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup 2022) जिंकेल अशी आशा फॅन्सना आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भारतीय टीम 15 वर्षांनी पूर्ण करील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आपल्या आवडीचे काही खेळाडू टीममध्ये समाविष्ट न झाल्याने फॅन्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. 15 खेळाडूंच्या टीममध्ये विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) यांची निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसनला (Sanju Samson) मात्र संधी देण्यात आली नाही. त्याच्या नावाची चर्चाही निवड समितीच्या बैठकीत झाली नाही, असा दावा बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये सॅमसनला संधी देण्यात आली होती. निवड समितीच्या बैठकीपूर्वी अशी चर्चा होती, की ऋषभ पंतऐवजी संजू सॅमसनला 15 जणांच्या टीममध्ये निवडलं जाऊ शकतं; मात्र त्याच्या नावावर चर्चाही झाली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डेमध्ये खेळू शकेल. कारण निवड समितीला झिम्बाब्वे दौऱ्यानंतर सातत्य राखण्याची अपेक्षा आहे. त्याव्यतिरिक्त पंतला बाहेर ठेवण्याबद्दलही चर्चा झाली नाही. टीमच्या टॉप ऑर्डरमधला तो एकमेव डावखुरा बॅट्समन आहे. जेव्हा त्याची बॅट चालते, तेव्हा तो आपल्या ताकदीवर मॅचमध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतो.' टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतीय टीमला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिज खेळायची आहे. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन मॅचेसची टी-20 सीरिज सुरू झाली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. टीम इंडियाची या स्पर्धेतली सुरुवात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचने 23 ऑक्टोबर रोजी होईल.
First published:

पुढील बातम्या