Home /News /sport /

T20 World Cup : WTC Final आणि वर्ल्ड कप हरलेल्या 5 खेळाडूंचं टीम इंडियातलं स्थान पक्कं!

T20 World Cup : WTC Final आणि वर्ल्ड कप हरलेल्या 5 खेळाडूंचं टीम इंडियातलं स्थान पक्कं!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी?

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आता एक महिन्याचा कालावधी उरला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची (Team India) घोषणा 7 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 6 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आता एक महिन्याचा कालावधी उरला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची (Team India) घोषणा 7 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) खेळलेल्या कमीत कमी 5 खेळाडूंची या टीममध्ये निवड होणं निश्चित मानलं जात आहे, यामध्ये टीमचा कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli) समावेश आहे. 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) टीमचा कर्णधार होता. यावेळचा वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर फायनल 14 नोव्हेंबरला होईल. स्पर्धेत 16 टीम सहभागी होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटशिवाय, रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या पाच खेळाडूंचं नाव पक्कं आहे. हे सगळे खेळाडू 2016 टी-20 वर्ल्ड कपशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही खेळले होते. टीम इंडियाला 2007 नंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला नाही. त्यामुळे टीमकडे 14 वर्षांचा वनवास मिटवण्याची संधी आहे. टीम इंडिया पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये आहे. पाकिस्तानविरुद्धच्याच सामन्याने भारताच्या (India vs England) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानच्या टीमला अजूनपर्यंत एकदाही वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करता आलेलं नाही. भारत आणि पाकिस्तानशिवाय या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि क्वालिफायरच्या दोन टीम असतील. दुसऱ्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्याशिवाय क्वालिफायरमधून आलेल्या दोन टीमचा समावेश असेल. वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड कपची गतविजेती टीम आहे, याशिवाय सर्वाधिक 2 वेळा त्यांनीच ही स्पर्धा जिंकली आहे. 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रलियाला अजून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 2 वर्षात 2 वर्ल्ड कप टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन मागच्या वर्षी भारतात होणार होतं, पण कोरोनामुळे स्पर्धा रद्द करण्यात आली. आता या स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये होणार आहे. यानंतर लगेच 2022 सालीही ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल. आतापर्यंत 6 वेळा टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं. यात भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड एकदा चॅम्पियन झाल्या, तर वेस्ट इंडिज दोनवेळा जिंकली. आयपीएलचा फायदा टीम इंडियाचे खेळाडू टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएल (IPL 2021) खेळणार आहेत. आयपीएल स्पर्धा 19 ते 15 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएल होणार असल्यामुळे याचा फायदाही भारतीय खेळाडूंना होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या