IPL 2021 : लिलावामध्ये या क्रिकेटपटूवर लागणार कोट्यवधींची बोली!

IPL 2021 : लिलावामध्ये या क्रिकेटपटूवर लागणार कोट्यवधींची बोली!

सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali) टी-20 ट्रॉफीमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएल (IPL 2021) च्या टीमची नजर आहे. या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर यंदाच्या आयपीएल लिलावात मोठी बोली लागेल.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali) टी-20 ट्रॉफीमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएल (IPL 2021) च्या टीमची नजर आहे. या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर यंदाच्या आयपीएल लिलावात मोठी बोली लागेल. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये 37 बॉलमध्येच अर्धशतक करणाऱ्या मोहम्मद अजहरुद्दीन हा चर्चेत आला आहे. आयपीएल लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागेल, असं बोललं जात आहे. फेब्रुवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव होणार आहे.

2015 साली अजहरुद्दीनने केरळसाठी पदार्पण केलं. आयपीएल लिलावाबाबत त्याला विचारलं असता, याची चिंता आपण करत नसल्याचं तो म्हणाला. 'मी सध्या चांगल्या लयीत आहे, आयपीएल लिलाव किंवा इतर कोणत्याही गोष्टीची मला चिंता नाही. माझं लक्ष्य सध्या तरी आंध्र प्रदेशविरुद्धच्या पुढच्या मॅचवर आहे,' अशी प्रतिक्रिया त्याने पीटीआय भाषाशी बोलताना दिली.

केरळच्या या विकेट कीपर बॅट्समनने केलेली शतकी खेळी कोणत्याही भारतीय बॅट्समनने केलेली तिसरी सगळ्यात जलद होती. या खेळीआधी आपण कोणतीही खास तयारी केली नव्हती. माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमॉर यांनी मला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं, त्यामुळे माझा खेळ प्रभावित झाला, असं वक्तव्य अजहरुद्दीनने केलं.

'मी ओपनिंग बॅट्समन आहे, जेव्हा डेव्ह व्हॉटमोर प्रशिक्षक झाले, तेव्हा त्यांनी मला मधल्या फळीतला बॅट्समन केलं. टीमच्या गरजेमुळे मला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला यावं लागलं. पण हा निर्णय माझ्यासाठी योग्य नव्हता. मी सध्याचे प्रशिक्षक टिनू योहाना यांना वरच्या फळीत खेळण्यासाठी आग्रह धरला. मुंबईविरुद्ध खेळपट्टी चांगली होती आणि मी आत्मविश्वासाने खेळलो. माझं लक्ष्य आयपीएल खेळणं आणि रणजी ट्रॉफीमध्ये शतक करणं आहे,' असं अजहरुद्दीने सांगितलं.

माझ्या नावापासून ते क्रिकेट कारकिर्दीपर्यंतचा निर्णय माझा भाऊ कमरूद्दीनने घेतला. मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या नावावरूनच माझं नाव ठेवण्यात आल्याचंही अजहरुद्दीन म्हणाला.

Published by: Shreyas
First published: January 17, 2021, 10:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या