मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दीपक हुड्डाची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार, कृणाल पांड्यावर केले आरोप

दीपक हुड्डाची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार, कृणाल पांड्यावर केले आरोप

बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुड्डाने (Deepak Hooda) सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून (Syed Mushtaq Ali Trophy) माघार घेतली आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुड्डाने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

बडोदा, 10 जानेवारी : कोरोना व्हायरसनंतर पहिल्यांदाच भारतात स्थानिक क्रिकेटला सुरूवात होत आहे. रविवारपासून सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy) टी-20 ट्रॉफी सुरू होईल, पण त्याआधीच या स्पर्धेत वादाची ठिणगी पडली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुड्डाने (Deepak Hooda) या स्पर्धेतून माघार घेतली आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुड्डाने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुड्डाने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यांच्यात बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियममध्ये भांडण झालं. कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुड्डाने केला. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला आहे, ज्यात कृणाल पांड्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं या मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे.

रविवारी होणाऱ्या पहिल्या मॅचसाठीच्या 17 सदस्यांच्या टीममध्ये उपकर्णधार असूनही दीपक हुड्डाचं नाव नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर दबाव होता, म्हणून त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचंही बोललं जात आहे. हुड्डा हा बडोद्याचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी, 68 लिस्ट ए मॅच आणि 123 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यावेळी बडोद्याच्या टीममध्ये युसूफ पठाणही नाही, त्यामुळे हुड्डाने नाव मागे घेणं त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या टीम आणि ग्रुप

एलीट ग्रुप ए : जम्मू काश्मीर , कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, रेल्वे , त्रिपुरा (ठिकाण : बेंगलुरू)

एलीट ग्रुप बी : ओडिसा, बंगाल, झारखंड, तामीळनाडू, आसाम , हैदराबाद (ठिकाण : कोलकाता)

एलीट ग्रुप सी : गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा, उत्तराखंड (ठिकाण : बडोदा)

एलीट ग्रुप डी : सेना, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश , गोवा (ठिकाण : इंदूर)

एलीट ग्रुप ई : हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, मुंबई, केरळ, पुडुच्चेरी (ठिकाण : मुंबई)

प्लेट समूह : चंडीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणीपूर, मिझोराम, सिक्किम , अरुणाचल प्रदेश (ठिकाण : चेन्नई)

First published: