मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Syed Mushtaq Ali Trophy : टीम निवडीआधी सराव सामन्यातली अर्जुन तेंडुलकरची कामगिरी

Syed Mushtaq Ali Trophy : टीम निवडीआधी सराव सामन्यातली अर्जुन तेंडुलकरची कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy)साठी मुंबईच्या टीमची लवकरच निवड होणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला संघर्ष करावा लागला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy)साठी मुंबईच्या टीमची लवकरच निवड होणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला संघर्ष करावा लागला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy)साठी मुंबईच्या टीमची लवकरच निवड होणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला संघर्ष करावा लागला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 26 डिसेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy)साठी मुंबईच्या टीमची लवकरच निवड होणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला संघर्ष करावा लागला. टीम डी कडून खेळणाऱ्या अर्जुनने सगळ्या मॅच मिळून 4 विकेट घेतल्या. तर बॅटिंगमध्येही त्याला कमाल करता आली नाही. अर्जुनने तीन इनिंगमध्ये फक्त 7 रन केले. या निराशाजनक कामगिरीमुळे अर्जुन तेंडुलकर याची मुंबईच्या टीममध्ये निवड होणं कठीण दिसत आहे. 21 वर्षांच्या अर्जुनने पहिल्या सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. 4 ओव्हरमध्ये त्याने 23 रन देऊन 2 विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन एक विकेट मिळवली. सूर्युकमारने एका ओव्हरमध्ये फटकावले 21 रन अर्जुन तेंडुलकरने ए टीमविरुद्ध 37 रन दिले. चौथ्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही, त्याने टाकलेल्या 15 बॉलमध्ये विरोधी टीमने 21 रन काढले. टीम बी विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने अर्जुन तेंडुलकरच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 रन काढले. निवड समितीची नजर अर्जुनवर पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी टीमची निवड करेल. जर अर्जुनची टीममध्ये निवड झाली तर पहिल्यांदाच त्याला सीनियर टीमकडून खेळण्याची संधी मिळेल. याआधी अर्जुन भारताच्या अंडर-19 टीमकडून टेस्ट खेळला आहे. तसंच त्याने भारतीय टीमला नेटमध्ये बॉलिंग केली आहे. आयपीएलच्या या मोसमात नेट बॉलर म्हणून अर्जुन मुंबईच्या टीमसोबत युएईला गेला होता. तुषार देशपांडे, सूर्या चमकले इंडिया ए कडून खेळलेल्या तुषार देशपांडे याने सर्वाधिक 9 विकेट घेतल्या. तर बॅटिंगमध्ये सूर्यकुमार यादवने 240 रन केले, यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. आयपीएलमध्ये संघर्ष करणारा यशस्वी जयस्वाल 164 रनसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवम दुबेने 114 रन केले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे यांची निवड निश्चित मानली जात आहे. 10 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सराव सामन्यातील मुंबईची टीम टीम ए: श्रेयस अय्यर (कर्णधार), आकाश गोयल, प्रसाद पवार, धवल कुलकर्णी, दीपक शेट्टी, आदित्य धूमळ, सरफराज खान, शशांक अत्तार, सागर मिश्रा, सुफियान शेख, कुणाल थोरात, अथर्व पुजारी, अंजुल पुजारी, अंजदीप लाड, मनदीप लाड. टीम बी: सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक तमोर, तुषार देशपांडे, आतिफ अतरवाला, विनायक भोइर, सुजीत नायक, सिद्धेश लाड, अदीब उस्मानी, तनुश कोटियन, खिजर दफादार, सिद्धार्थ अकरे, मोहित अवस्थी, अग्नी चोप्रा, आकिब कुरेशी, कल्पेश सावंत. टीम सी: आदित्य तरे (कर्णधार), रोस्टन डायस, शिवम दुबे, शम्स मुलानी, शुभम रांजणे, अंकुश जयसवाल, रौनक शर्मा, साईराज पाटील, केविन डी अल्मेडा, अखिल हेरवाडकर, श्रेयस गुरव, अमित पांडे, रोहन राजे, प्रशांत सोळंकी, प्रयाग भाटी. टीम डी: यशस्वी जयसवाल (कर्णधार), सचिन यादव, गौरीश जाधव, आकाश पारकर, भूपेन लालवानी, अरमान जाफर, चिन्मय सुतार, ध्रूमील मटकर, अमन खान, अर्जुन तेंदुलकर, आशय सरदेसाई, क्रृतिक हनागवाडी, परीक्षित वलसंगकर, सलमान खान, सक्षम झा.
First published:

पुढील बातम्या