मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अर्जुन सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच 'मोठ्या' स्पर्धेत खेळणार, मुंबईच्या टीममध्ये निवड

अर्जुन सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच 'मोठ्या' स्पर्धेत खेळणार, मुंबईच्या टीममध्ये निवड

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची पहिल्यांदाच स्पर्धात्मक (प्रौढांच्या) क्रिकेटसाठी निवड झाली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी (Sayed Mushtaq Ali Trophy) अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या टीममध्ये दिसेल.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 जानेवारी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची पहिल्यांदाच स्पर्धात्मक (प्रौढांच्या) क्रिकेटसाठी निवड झाली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी (Sayed Mushtaq Ali Trophy) अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या टीममध्ये दिसेल. मुंबईच्या 22 सदस्यांच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या टीमचे निवड समिती प्रमुख सलिल अंकोला यांनी शनिवारी अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्याचं सांगितलं.

अर्जुन तेंडुलकरशिवाय कृतिक हंगावडी या फास्ट बॉलरचीही मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. याआधी बीसीसीआय (BCCI) ने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची निवड करायला परवानगी दिली होती. पण कोरोनामुळे ही संख्या 2 ने वाढवण्यात आली.

बीसीसीआयच्या नियमांमुळे मुंबईने सुरूवातीला 20 खेळाडूंची निवड केली होती. पण आता या टीममध्ये आणखी दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 21 वर्षांच्या अर्जुनची पहिल्यांदाच मुंबईच्या सिनियर टीममध्ये निवड झाली आहे. याआधी तो अंडर-19 आणि अंडर-23 स्पर्धांमध्ये खेळत होता. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंडर-19 टेस्टमध्ये अर्जुन भारताच्या टीममध्ये होता. याचसोबत त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंगचा सरावही दिला.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) कडे देण्यात आलं आहे. 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

मुंबईची टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, यशस्वी जयसवाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजीत नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारदे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सूफियान शेख, अर्जुन तेंडुलकर, कृतिक हंगावडी

First published:
top videos