मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Syed Mushtak Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरचं मुंबईसाठी पदार्पण

Syed Mushtak Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरचं मुंबईसाठी पदार्पण

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबईसाठी पदार्पण केलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) च्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 जानेवारी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबईसाठी पदार्पण केलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) च्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. ऑलराऊंडर असलेला अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आणि बॅट्समन आहे. याआधी अर्जुन मुंबई अंडर-19, इंडिया अंडर-19 कडून श्रीलंकेविरुद्ध चार दिवसांची मॅच खेळला. तसंच टीम इंडियाला त्याने नेटमध्ये बॉलिंग करून सरावही दिला होता. 2017 साली इंग्लंड दौऱ्यात अर्जुनच्या यॉर्करमुळे जॉनी बेयरस्टोच्या पायाला दुखापत झाली होती.

मुंबईच्या सिनियर टीममध्ये पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकरची निवड झाली आहे. अर्जुनचे वडिल सचिन तेंडुलकरने वयाच्या 15 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. 1988 साली रणजी ट्रॉफी मॅचमध्ये गुजरातविरुद्ध सचिन पहिल्यांदा मैदानात उतरला.

कर्णधार असताना 1994-95 साली सचिनने पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. याचसोबत 1999-2000, 2008-09 आणि 2012-13 साली मुंबईचा रणजी ट्रॉफीमध्ये विजय झाला तेव्हा सचिन मुंबईच्या टीममध्ये होता.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे या मॅचमध्ये विजय मिळवणं मुंबईसाठी गरजेचं आहे.

मुंबईची टीम

यशस्वी जयस्वाल, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, अर्जुन तेंडुलकर, धवल कुलकर्णी, आकाश पारकर

First published: