मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मराठमोळ्या सुयश जाधवचा विक्रम, टोकयो पॅरालिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला भारतीय

मराठमोळ्या सुयश जाधवचा विक्रम, टोकयो पॅरालिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला भारतीय

मराठमोळा स्विमर सुयश नारायण जाधव (Suyash Jadhav) हा टोकयो पॅरालम्पिकसाठी (Tokyo Paralympics) क्वालिफाय झालेला पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : मराठमोळा स्विमर सुयश नारायण जाधव (Suyash Jadhav) हा टोकयो पॅरालम्पिकसाठी (Tokyo Paralympics) क्वालिफाय झालेला पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. फक्त पॅरालिम्पिकच नाही, तर ऑलिम्पिकमध्येही अजून एकाही भारतीय स्विमरला क्वालिफाय होता आलेलं नाही. सुयश टोकयो ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर बटरफ्लाय S-7 कॅटगरी आणि 200 मीटर वैयक्तिक कॅटगरीमध्ये खेळेल. 27 वर्षांचा सुयश त्याच्या 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई पॅरा खेळातल्या कामगिरीमुळे क्वालिफाय झाला.

टोकयो पॅरालम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 50 मीटर बटरफ्लाय प्रकारासाठी 0:32.90 अशी वेळ ठेवण्यात आली होती. सुयशने जकार्तामध्ये झालेल्या स्पर्धेत 0:32.71 मिनिटांमध्येच रेस पूर्ण करून सुवर्ण पदक पटकावलं होतं. तर वैयक्तिक प्रकारात 200 मीटरसाठी 2:57.09 ही वेळ निश्चित करण्यात आली, पण सुयशने 2:56.51 वेळात रेस पूर्ण करून ब्रॉन्झ मेडल मिळवलं. जकार्तामध्ये सुयशला एकूण तीन पदकं मिळाली.

सुयश हा सध्या पुण्याच्या बालेवाडीमध्ये सराव करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या मधल्या आठवड्यात सुयशला टोकयोला पोहोचण्याची अपेक्षा आहे. तिकडे गेल्यावर त्याला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. पॅरालम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये टोकयोमध्ये खेळवली जाणार आहे.

सुयश हा सोलापूर जिल्ह्याच्या करमाळामधील भाळवणीचा आहे. 2020 साली त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

12 वर्षांचा असताना एका लग्नामध्ये सुयषला वीजेचा धक्का लागला, या अपघातात त्याने दोन्ही हात गमावले. यानंतरही सुयशने त्याचा संघर्ष सुरूच ठेवला. या संघर्षात त्याच्या वडिलांनीही त्याला साथ दिली. सुयशचे वडील नारायण जाधवही स्विमर आहेत. एका शाळेमध्ये ते क्रीडाशिक्षक म्हणून शिकवतात.

First published:

Tags: Olympic, Sports