सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर कोहलीचा शोकसंदेश, क्रीडाविश्वातून श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर कोहलीचा शोकसंदेश, क्रीडाविश्वातून श्रद्धांजली

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं मंगळवारी रात्री निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली होती. दरम्यान त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं की, सुषमा स्वराज यांच्या निधन झाल्याचं ऐकून खुप दु:ख झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपुर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सुषमा स्वराज एक अनुभवी राजकारणी आणि भाजपचा एक मोठा स्तंभ होत्या. मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालं आहे.

देशाच्या परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला होत्या. तसंच त्यांनी राजधानी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता. उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती.

परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर त्या अतिशय सक्रिय होत्या. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अडचणीत सापडलेल्या जगभरातील भारतीयांना मदत केली. याचा शेकडो नागरिकांना फायदा झाला.

VIDEO: एक कणखर नेतृत्व हरपलं; आठवणीतल्या सुषमा स्वराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या